Kavita Dwivedi

Baramati News : बारामती लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी तयारी पूर्ण: निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी

511 0

बारामती : जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात बारामती लोकसभा मतदासंघाकरीता मंगळवार ७ मे रोजी मतदान होत असून मतदानाच्यादृष्टीने मतदार संघातील सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर व खडकवासला असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. दौंड विधानसभा मतदासंघात ३ लाख ४ हजार ६०७, इंदापूर ३ लाख २३ हजार ५४१, बारामती ३ लाख ६९ हजार २१७, पुरंदर ४ लाख २९ हजार ३५१, भोर ४ लाख ७ हजार ९२१ व खडकवासला ५ लाख ३८ हजार ३१ असे एकूण मतदार २३ लाख ७२ हजार ६६८ मतदार आहेत.

बारामती विधानसभा मतदारंसघात ३८० मतदान केंद्र, पुरंदर ४२१, इंदापूर ३३०, दौंड ३०९, भोर एकूण ५६१ व खडकवासला विधानसभा मतदारसंघात ४६५ मतदान केंद्र आहेत. ५ व ५ पेक्षा अधिक मतदान केंद्र असलेले दौंड विधानसभा मतदारसंघात ६, इंदापूर ५, बारामती ६, पुरंदर १७, भोर ९ व खडकवासला ४४ असे एकूण ८७ मतदान केंद्रे आहेत. दौंड विधानसभा मतदासंघात २ हजार ५९७, इंदापूर २ हजार ५१८, बारामती ३ लाख ५००, पुरंदर ३ हजार ३७७, भोर ४ हजार ६२ व खडकवासला मतदार संघासाठी ४ हजार ४९ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मतदारसंघनिहाय निवडणुकीच्या अनुषंगाने साहित्याचे ६ मे रोजी वितरण करण्यात येणार असून दौंड विधानसभा मतदासंघाकरीता शासकीय धान्य गोदाम, मदर तेरेसा चौक, नगरमोरी दौंड, इंदापूर विधानसभा मतदारसंघाकरीता शासकीय धान्य गोदाम कालठण रोड, इंदापूर, बारामती विधानसभा मतदारसंघाकरीता महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहत महामंडळ परिसर, बारामती, पुरंदर विधानसभाकरीता श्री कातोबा हायस्कूल दिवे, भोर मतदारसंघात भोर तालुक्याकरीता औद्योगिक प्रशिक्षण संस्था भोर आणि वेल्हे तालुक्याकरीता जुनी पंचायत समिती, वेल्हे व जिल्हा परिषद मध्यवर्ती शाळा कुरण खुर्द, मुळशी तालुक्याकरीता राणी लक्ष्मीबाई सैनिकी मुलींची शाळा कासार आंबोली, आणि खडकवासला मतदारसंघाकरीता स्प्रिंग डेल प्ले ग्रांऊड वडगाव बु. ता. हवेली येथून वितरण करण्यात येणार आहे, अशी माहितीदेखील निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती द्विवेदी यांनी दिली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Malshej Ghat : माळशेज घाटात भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

Ulhasnagar Fire: उल्हासनगरमध्ये जे. के.ऑर्किड इमारतीला लागली भीषण आग

Atul Save : ओबीसी, एससी, एसटी आरक्षण रद्द करणार नाही याची हमी काँग्रेसने द्यावी; भाजप मंत्री अतुल सावे यांचे आव्हान

Mumbai Police Death : मुंबईतील ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूचं गूढ वाढलं; तपासात ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Maharashtra Politics : दानवेंची भेट नाकारल्याने मराठा आंदोलक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा

Pune News : बारामती लोकसभा निवडणूकीच्या मतदानासाठी 7 मे रोजी कामगारांना भरपगारी सुट्टी- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

Hingoli Accident : दवाखान्यातून परतताना भीषण अपघात; 2 जणांचा जागीच मृत्यू

Loksabha Election : काँग्रेसला मोठा धक्का ! ऐन निवडणुकीच्या तोंडावर ‘या’ नेत्याने घेतली माघार

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांना मोठा धक्का !’या’ उमेदवाराचा अर्ज ठरला अवैध

Junnar News : बैलगाडा शर्यतीदरम्यान गेला तोल; मात्र पठ्ठयाने प्रसंगावधान राखत पूर्ण केली शर्यत

Onion Export : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! कांद्यावरील निर्यातबंदी हटवली

Gangadhar Gade : ज्येष्ठ नेते माजी मंत्री गंगाधर गाडे यांचं निधन

Weather Update : ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

Pune News : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टतर्फे ‘महाराष्ट्र दिन’ व ‘कामगार दिना’निमित्त महापालिकेच्या सफाई कामगारांचा सत्कार

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!