नाशिक : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन आपण नाशिक लोकसभा (Nashik Loksabha) लढवणार नसल्याचे जाहीर केले होते. यानंतर नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराचा तिढा सुटेल असे वाटले होते मात्र हा तिढा अजूनही सुटायचे नाव घेईना. भुजबळांच्या माघारी नंतर तरी नाशिकच्या जागेचा तिढा सुटेल, असं बोललं जात असताना भाजपने नाशिकच्या जागेवर पुन्हा दावा सांगितला आहे.
भाजपने नाशिकच्या जागेसंदर्भात दिला ‘हा’ प्रस्ताव
ठाण्याच्या बदल्यात नाशिकची जागा भाजपला द्या, असा नवा प्रस्ताव भाजपने सेनेला दिल्याची चर्चा आहे. या प्रस्तावामुळे हा तिढा अधिक वाढला आहे.नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार निवडणुकीला अवघा एक महिना शिल्लक असताना देखील निश्चित होत नसल्याने इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. मात्र भाजपने कोणताही दावा केला तरी नाशिकची जागा ही शिवसेनेचीच असेल, अशी भूमिका शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
BJP Office : भाजपच्या प्रदेश कार्यालयाला लागली आग; समोर आले ‘हे’ कारण
Postal Ballot Voting : पोस्टल बॅलेट वोटिंग म्हणजे काय? त्याची प्रक्रिया काय आहे?
Vasant More : मीडियावरील वादग्रस्त वक्तव्यानंतर वसंत मोरेंनी ‘ती’ पोस्ट करून केली सारवासारव
Milind Narvekar : मिलिंद नार्वेकरांना शिंदेंनी दिली उमेदवारीची ऑफर?
Pune Crime : परदेशातून परतलेल्या महिलेने आपल्या 4 वर्षाच्या चिमुकल्यासह केली आत्महत्या
Solapur News : हृदयद्रावक ! 8 वर्षीय चिमुकलीला अवकाळी पावसामुळे गमवावा लागला जीव
Accident News : जवानांच्या बसचा भीषण अपघात; 10 जण गंभीर जखमी
Loksabha : मतदानाच्या दुसऱ्या दिवशी भाजपच्या ‘या’ उमेदवाराचं निधन
Weather Update : पुणे जिल्ह्यात हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी
Lok Sabha Elections : प्रकाश आंबेडकर यांना अमरावतीमध्ये मोठा धक्का !
Accident News : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर ट्रॅव्हल्सला भीषण आग