Uddhav Thackeray : प्रेरणा गीतातील ‘त्या’ शब्दांवर आक्षेप घेतल्याने उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर संतप्त टीका

539 0

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या नव्या प्रचार गीतातील 2 शब्दांवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आक्षेप घेण्यात आला होता. यानंतर उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झाले. यामुळे उद्धव ठाकरेंनी याबाबत तातडीने पत्रकार परिषद बोलावून केंद्रीय निवडणूक आयोगावर संतप्त टीका केली.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?
अटलजी पंतप्रधान असताना निवडणूक आयोगाने बाळासाहेबांचा मतदानाचा हक्क 6 वर्षासाठी काढून घेतला होता. हिंदू धर्माचा प्रचार केल्याचा ठपका त्यांच्यावर होता. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या प्रचारातील भाषणात ‘बजरंग बली की जय बोलून बटण दाबा’ असं सांगतायत. अमित शाह ‘बजरंग बलीचं दर्शन देतो’ असे म्हणतात. दरम्यानच्या काळात निवडणूक आयोगाचा नियम बदललाय का? असा प्रश्न यावेळी उद्धव ठाकरेंनी विचारला.

आमचं पुर्वीचं गीत जनता उत्साहाने गाते. आम्ही मशाल चिन्ह मिळाल्यानंतर प्रेरणा गीत आणलं. त्यातील हिंदु हा तुझा धर्म, जाणून घे मर्म..यातील हिंदू हा शब्द निवडणूक आयोगाने काढायला लावला आहे. आम्ही हिंदु धर्माच्या आधारे मत मागितलं नाही. चाकर असल्याप्रमाणे वागणाऱ्या निवडणूक आयोगाने यावर उत्तर द्यायला हवे. या गाण्याच्या बॅकग्राऊंडमध्ये जय भवानी, जय शिवाजी घोषणा आहे. यातील जय भवानी हा शब्द काढावा असे आयोगाने म्हटले आहे. तसेच हिंदु हा तुझा धर्म या शब्दावरही निवडणूक आयोगाने आक्षेप घेतलाय.

यामुळे उद्धव ठाकरेंनी तातडीची पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राच्या कुलदैवताबद्दल द्वेश जनता खपवून घेणार नाही. कोणत्याही परिस्थितीत जय भवानी हा शब्द काढला जाणार नाही, असे उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Solapur News : हृदयद्रावक ! 8 वर्षीय चिमुकलीला अवकाळी पावसामुळे गमवावा लागला जीव

Accident News : जवानांच्या बसचा भीषण अपघात; 10 जण गंभीर जखमी

Loksabha : मतदानाच्या दुसऱ्या दिवशी भाजपच्या ‘या’ उमेदवाराचं निधन

Weather Update : पुणे जिल्ह्यात हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी

Lok Sabha Elections : प्रकाश आंबेडकर यांना अमरावतीमध्ये मोठा धक्का !

Accident News : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर ट्रॅव्हल्सला भीषण आग

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!