Palghar News

Palghar News : पालघरमध्ये भाजपाच्या उमेदवारीचे बनावट पत्र प्रसिद्ध ; प्रदेश भाजपातर्फे पोलिसांत तक्रार दाखल

944 0

पालघर : पालघर (Palghar News) लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टी तर्फे प्रकाश कृष्णा निकम यांना उमेदवारी दिल्याबाबतचे भाजपा केंद्रीय कार्यालयाचे खोटे पत्र प्रसारित केल्याबद्दल प्रदेश भाजपातर्फे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे. भारतीय जनता पार्टीच्या आचार संहिता व काय़दा विभागाचे प्रदेश अध्यक्ष ॲड.अखिलेश चौबे यांनी ही माहिती बुधवारी भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. भाजपाच्या खोट्या लेटरहेडवर व्हायरल करण्यात आलेले हे पत्र म्हणजे दोन पक्षांत तेढ निर्माण करण्यासाठी रचलेला कट असल्याचेही ॲड.चौबे यांनी सांगितले. प्रदेश भाजपा कायदा प्रकोष्ठचे संयोजक ॲड. शहाजी शिंदे, प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान यावेळी उपस्थित होते.

श्री. चौबे यांनी सांगितले की, पालघर मतदारसंघासाठी प्रकाश निकम यांना भाजपातर्फे उमेदवारी दिल्याचे पक्षाचे केंद्रीय कार्यालयाचे बनावट पत्र समाजमाध्यमांतून प्रसारित झाल्याचे कळताच आपण त्या विरोधात मंगळवारी रात्री उशिरा मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. भाजपाच्या बनावट लेटरहेडवर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष असलेल्या प्रकाश कृष्णा निकम यांना उमेदवारी दिल्याचे पत्र प्रसिद्ध करून भाजपा – शिवसेना या दोन्ही पक्षांत तेढ निर्माण करण्यासाठी रचलेला हा कट असून त्याची कसून चौकशी करण्याची मागणी आपण केली आहे.

पालघर लोकसभा जागेसाठी अद्याप महायुतीचा उमेदवार ठरलेला नसताना जाणूनबुजून खोटे पत्र व्हायरल करून महायुतीच्या भाजपा आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये नाहक तेढ निर्माण करण्याचा केलेला हा प्रयत्न हाणून पाडू असेही चौबे यांनी सांगितले. या प्रकरणी अज्ञात इसमाविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 467, 468 आणि 417 अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आल्याचे ॲड. चौबे यांनी सांगितले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : ‘मनसे ताकदीने मोहोळ यांचा प्रचार करणार’ : अमित ठाकरे यांचा विश्वास

Pune Loksabha : पुणे लोकसभेच्या रिंगणात ‘AIMIM’ची एन्ट्री; त्यामुळे कोणाला होणार फायदा अन् कोणाला बसणार फटका?

T- 20 World Cup : टी- 20 वर्ल्ड कपसाठी ‘या’ 5 विकेटकिपर खेळाडूंनी सिद्ध केली दावेदारी

Abhijeet Bichukale: अभिजीत बिचुकले लोकसभा निवडणूक लढवणार; ‘या’ दिवशी भरणार अर्ज

Pune News : पुण्यात भरदिवसा बांधकाम व्यावसायिकावर गोळीबाराचा प्रयत्न; CCTV फुटेज आले समोर

Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरासारखीच ‘ही’ आहेत भारतातील 7 प्रसिद्ध राम मंदिरे

UPSC Results : पुण्यातील पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाने UPSC परीक्षेत मिळवले घवघवीत यश

Pune Crime : धक्कादायक! लग्नाच्याच दिवशी 28 वर्षीय तरुणाने संपवलं जीवन

Pune University : एक भेट पुणे विद्यापीठाला; विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी..!

Pune Loksabha : पुणे लोकसभेसाठी MIM कडून अनिस सुंडके यांना उमेदवारी जाहीर

Eknath Khadse : खळबळजनक ! एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी

Astavakrasana : अष्टवक्रासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!