Anis Sundke

Pune Loksabha : पुणे लोकसभेसाठी MIM कडून अनिस सुंडके यांना उमेदवारी जाहीर

222 0

पुणे : अनिस सुंडके नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, लहान भाऊ रईस सूंडके नगरसेवक, तर अनिस सुंडके यांची पत्नी हमिदा सुंडके पुणे मनपा 2017 च्या निवडणुकीत (Pune Loksabha) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून आल्या होत्या. गेल्या पंचवीस वर्षापासून पुणे येथील राजकारणात सक्रीय असलेले अनिस सुंडके यांची आज 16/04/2024 रोजी औरंगाबाद येथे ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुदुल मुस्लिमिन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी हे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या निवडणूक प्रचारासाठी आले होते. याच दरम्यान झालेल्या जाहीर सभेत पुणे लोकसभा मतदारसंघ येथून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली.

याप्रसंगी एम आय एम पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील कार्याध्यक्ष अब्दुल गफार कादरी औरंगाबाद व पुणे येथील अनेक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मंचावर उपस्थित होते.खासदार ओवेसी यांनी सांगितले की आम्ही पुण्याच्या निवडणुकीमध्ये ताकतीने उतरणार आहोत आम्ही का निवडणूक लढू नये निवडणूक लढविले पाहिजे अशी आमची सर्वांची मनापासून इच्छा आहे मला खात्री आहे की पुण्याची लोकसभा निवडणुकीत एमआयएम पक्षाचे उमेदवार अनिस सुंडके भरघोस मताने निवडून येतील.

जय भीम जय मीमचा नारा देत सर्व सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन पुणे लोकसभा मतदारसंघात पूर्ण ताकतीने निवडणूक लढविण्याचा निर्धार एम आय पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिस सुंडके व पुण्यातील पक्षाचे सर्व पद अधिकाऱ्यांनी घेतले आहे. याप्रसंगी बोलताना अनिस सुंडके यांनी सांगितले की गेल्या पंचवीस वर्षापासून मी पुण्यातील राजकारणात सक्रिय आहे. सर्व जाती-धर्माचे माझे चांगले संबंध असून पुण्यातील अनेक प्रश्नांना मी मार्गी लावल्यास काम केले आहे. गेल्या अनेक निवडणुकीत मी काँग्रेस पक्षाचा व नंतर शरदचंद्र पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबत काम केलेले आहे. पुणे महानगरपालिकेत मी अनेक पद भूषविलेले असून पश्चिम महाराष्ट्र येथे सर्व धर्म लोकांशी माझे चांगले संपर्क आहे पुणे महानगरपालिकेत स्थायी समिती अध्यक्ष असताना पुण्यासाठी अनेक विधायक काम केल्याची माहिती अनिस सुंडके यांनी दिली.

अनिस सुंडके यांनी सांगितले की राजकारणात असताना अनेक वर्षांचा हो विविध प्रश्नांची मला जाणीव आहे. समाजाच्या प्रश्नांचा अनुभव असल्याने अनेक आजी-माजी नगरसेवक माझ्या संपर्कात आहे. पुण्यातील अनेक दिग्गज आजी-माजी नगरसेवकांचा एमआयएम पक्षामध्ये जाहीर प्रवेश करून घेण्यात येईल.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Eknath Khadse : खळबळजनक ! एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी

Astavakrasana : अष्टवक्रासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

Mumbai Pune Highway

Mumbai – Pune Highway : पुण्यावरुन मुंबईला येणारी वाहतूक आज दुपारी होणार बंद ; काय आहे नेमके कारण?

Posted by - July 24, 2023 0
लोणावळा : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai – Pune Highway) आज 2 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे दुपारी 12…

पर्यायी इंधनावरील वाहनांच्या क्षेत्रात पुणे नेतृत्व करेल, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (व्हिडिओ)

Posted by - April 2, 2022 0
पुणे- पुणे परिसरात पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन करणाऱ्या आणि या क्षेत्राशी संबंधित विविध उद्योग येत असून भविष्यात पुणे या…

गुलाम नबी यांची ‘सेकंड इनिंग’; नव्या राजकीय पक्षाची केली घोषणा

Posted by - September 4, 2022 0
काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर आझाद प्रथमच त्यांच्या मूळ निवासस्थानी जम्मूमध्ये जाहीर सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली…

VIDEO : अजित पवारांची नाना पाटेकर यांच्या पुण्याच्या डोणजे येथील निवासस्थानी भेट ; गणरायाचं घेतलं दर्शन…

Posted by - September 8, 2022 0
डोणजे : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अभिनेते नाना पाटेकर यांच्या पुण्याच्या डोणजे येथील निवासस्थानी भेट देऊन गणरायाचं दर्शन…

देशात समान नागरी कायदा आणावा ; ठाण्यातील उत्तर सभेत राज ठाकरेंची मागणी

Posted by - April 12, 2022 0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे  यांनी 2 एप्रिल गुढीपाडव्यानिमित्त शिवतीर्थावर जाहीर सभा घेतली होती. राज ठाकरे म्हणाले, ”भाषण करताना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *