Pune Crime

Pune Crime : धक्कादायक! लग्नाच्याच दिवशी 28 वर्षीय तरुणाने संपवलं जीवन

428 0

पुणे : पुण्यातून (Pune Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये घरी लग्नाची धामधूम सुरू असताना नवरदेवाने लग्नाच्या दिवशीच आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पिंपरी चिंचवडमध्ये ही घटना घडली आहे. घरात नातेवाईक, पाहुणे मंडळींची लगबग सुरू असताना नरदेवाने पहाटे विहिरीत उडी मारून आपल्या आयुष्याचा शेवट केला. आत्महत्या करण्याच्या अगोदर त्याने मला लग्न करायचे नाही असा मेसेज आपल्या कुटुंबियांना पाठवला. मंगळवारी पहाटे घडलेल्या या प्रकाराने मृत नवरदेवाच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

काय घडले नेमके?
सूरज रायकर असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तो तळेगाव दाभाडे इथं राहत होता. मंगळवारी त्याचं लग्न होतं. लग्नाची धामधूम घरात सुरू होती. सकाळी लवकर त्याने मामाला फोनही केला होता. त्यानंतर तो घरातून बाहेर पडला. त्याने मला लग्न करायचं नाही असा मेसेजही मामाला पाठवला होता. बराच वेळ तो न परतल्याने कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला.तेव्हा त्याची बाईक आणि मोबाईल विहिरीजवळ आढळून आला. त्याने घराजवळच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

लग्नाच्या दिवशीच सूरजने असा निर्णय का घेतला हे अद्याप समोर आलेलं नाही. त्याच्या आत्महत्येने आनंदी वातावरण असलेल्या लग्नघरात शोककळा पसरली. सूरजच्या आत्महत्येनंतर त्याच्या मित्रांनी तो असं कसं करू शकतो. तो आत्महत्या नाही करू शकत अशा भावना व्यक्त केल्या. सूरज एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune University : एक भेट पुणे विद्यापीठाला; विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी..!

Pune Loksabha : पुणे लोकसभेसाठी MIM कडून अनिस सुंडके यांना उमेदवारी जाहीर

Eknath Khadse : खळबळजनक ! एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी

Astavakrasana : अष्टवक्रासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

पुण्याच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासन कटीबद्ध– उपमुख्यमंत्री अजित पवार

Posted by - March 13, 2022 0
पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील विविध भागात पायाभूत सुविधा निर्माण करुन नागरिकांना उत्तम सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात…
Nagpur Crime News

Nagpur Crime News : मी ‘नासा’त शास्त्रज्ञ, तुम्हालाही नोकरी लावतो म्हणत तरुणाचा युवकांना 5.31 कोटींचा चुना

Posted by - August 5, 2023 0
नागपूर : आपण अनेकदा एखाद्याच्या भूल थापांना बळी पडतो. त्यामुळे अनेकदा आपली आर्थिक फसवणूक (Nagpur Crime News) केली जाते. नागपूरमध्ये…

नदीमध्ये पोहोण्याचा मोह तरुणाच्या जीवावर बेतला, इंद्रायणी नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

Posted by - April 12, 2023 0
पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने नदीपात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाला जीव गमवावा लागला. ही घटना मावळ तालुक्यातील कामशेत गावाजवळ घडली. मंगळवारी…
pune bomb

Pune News : खळबळजनक ! पुण्यातील एनडीए परिसरात खोदकाम करताना आढळला बॉम्ब; जंगलात नेवून केला स्फोट

Posted by - May 11, 2024 0
पुणे : शिवणे एनडीए परिसरात बाँब सापडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. शिवणे एनडीए परिसराच्या जवळील कमळजाई मंदिर परिसरात पुलाच्या बांधकामासाठी…

#CRIME NEWS : पत्नीचे सासऱ्यासोबत होते तसले संबंध ; संतापलेल्या पतीने वडिलांनाच डोक्यात दगड घालून संपवले, असा झाला खुनाचा उलगडा

Posted by - February 11, 2023 0
मिर्जापुर : मिर्जापुरमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पत्नीचे सासऱ्यांसोबतच अनैतिक संबंध होते. या गोष्टीवरून घरामध्ये रोज…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *