पुणे : शिक्षणाचे माहेर घर असणाऱ्या पुण्यात (Pune News) गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. या ठिकाणी भरदिवसा व्यक्तींवर हल्ला केला जात आहे. अशीच एक गोळीबारीची घटना पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर घडली आहे. या घटनेमुळे शहरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
काय घडले नेमके?
धीरज दिनेशचंद्र आरगडे असं गोळीबारातून बचावलेल्या बांधकाम व्यावसायिकाचं नाव आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास धीरज हे शहरातील जंगली महाराज रस्त्यावर असलेल्या वन प्लस शोरूमजवळ उभे होते. यादरम्यान अज्ञात आरोपींनी दोन वेळा गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बंदुकीतून गोळी फायर न झाल्याने आरोपींचा हा प्रयत्न फसला. ही संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
फायरिंगचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींनी फूड डिलिव्हरी बॉयसारखे कपडे घातले होते. याशिवाय त्यांनी हेल्मेट देखील घातलं होतं. शोरुमजवळ उभ्या असलेल्या धीरज यांच्यावर हल्लेखोरांनी दोन वेळा गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बंदुकीतून गोळी न सुटल्याने त्यांचा हा प्रयत्न फसला. नशीब बलवत्तर म्हणून धीरज हे जीवघेण्या हल्ल्यातून बचावले. आरडाओरड झाल्याने आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले. यानंतर धीरज आरगडे यांनी तातडीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरासारखीच ‘ही’ आहेत भारतातील 7 प्रसिद्ध राम मंदिरे
UPSC Results : पुण्यातील पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाने UPSC परीक्षेत मिळवले घवघवीत यश
Pune Crime : धक्कादायक! लग्नाच्याच दिवशी 28 वर्षीय तरुणाने संपवलं जीवन
Pune Loksabha : पुणे लोकसभेसाठी MIM कडून अनिस सुंडके यांना उमेदवारी जाहीर
Eknath Khadse : खळबळजनक ! एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी
Astavakrasana : अष्टवक्रासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?