जळगाव : सध्या राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यामध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. खडसे यांना चार वेगवेगळ्या मोबाईलवरुन धमकीचे फोन आले आहेत. दाऊद आणि छोटा शकीलकडून ही धमकी देण्यात आल्याचे समजत आहे.
या प्रकरणी एकनाथ खडसेंनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाईल धारकांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 15 आणि 16 एप्रिलला हे फोन आले असल्याची माहिती एकनाथ खडसेंनी आपल्या तक्रारीत दिली आहे. या सगळ्या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Astavakrasana : अष्टवक्रासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?