Video

Ajit Pawar : अजितदादांच्या भाषणादरम्यान शेतकऱ्यांनी घातला गोंधळ

293 0

भंडारा : भंडारा जिल्ह्यात आज शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडत आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी (Ajit Pawar) हजेरी लावली. डेंग्यू झाल्यानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. या कार्यक्रमादरम्यान अजित पवार यांच्या भाषणादरम्यान गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. एका शेतकऱ्याने बच्चू कडू यांचा फोटो असलेला बॅनर घेत घोषणाबाजी केली. या व्यक्तीला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले.

काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार म्हणाले, की काही कारणांनी हा कार्यक्रम पुढे जात होता. मुख्यमंत्र्यांनी ठरवलं दिवाळीनंतर पहिला कार्यक्रम भंडाऱ्यात करायचा. शासनाच्या कल्याणकारी योजना यामुळे सामान्य जनतेला मिळतात. भंडारा निसर्ग पर्यटनासाठी अनुकूल जिल्हा आहे. या ठिकाणी मुबलक पाणी आहे. आमच्या सरकारच्या योजना लोकांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी हा कार्यक्रम हाती घेतला आहे. सरकारचा कारभार लोकाभिमुख व्हायला हवा. राज्यातील प्रत्येक नागरिकाला हे सरकार माझ्यासाठी काम करत असल्याची भावना निर्माण व्हायला पाहिजे. गेल्या सव्वा वर्षात सरकारने अनेक कल्याणकारी योजना राबविल्या. पीक विमा योजना अतिशय महत्वाचा निर्णय सरकारने घेतला. आमच्या सरकारचा हा अतिशय महत्वाकांक्षी निर्णय आहे. जिथे अतिवृष्टी झाली. कमी पाऊस झालं तिथे वीमा वाटप झाले. एक हजार नऊ लाख चौपन कोटी रुपयांचे वाटप यातून होणार आहे. आम्ही मूळ शेतकरी असल्याने आम्हाला अडचणी माहिती आहे. एखाद पीक गेलं की त्याच्या अडचणी वाढतात आणि शेतकरी नाउमेद होऊन आत्महत्येचा विचार करतो.

कार्यक्रमातील गोंधळावर अजित पवारांची प्रतिक्रिया
अजित पवारांच्या भाषणादरम्यान एक शेतकरी हातात बॅनर घेऊन सरकार विरोधात नारे लावत पुढे आला. बॅनरवर बच्चू कडूंचा फोटो होता. यावेळी काहीसा गोंधळ झालेला पाहायला मिळाला. यावर अजित पवार म्हणाले, की काही विरोधक असे लोक पाठवून कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतात.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पुणे हादरलं! मध्यरात्रीच्या सुमारास पाठलाग करून तरुणाची निर्घृणपणे हत्या

Wardha News : तपासणीसाठी आलेल्या मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्याचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू

Pune Accident News : गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पुण्यतील डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू

Share This News

Related Post

crime

धक्कादायक ! लिफ्टमध्ये मान अडकून 13 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 15, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये लिफ्टचा दरवाजा अचानक…

निवडणुका झाल्यानंतर सरकार ओबीसी राजकीय आरक्षणाचा कायदा करणार का ? देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

Posted by - March 4, 2022 0
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी राजकीय आरक्षणाचा आंतरिम अहवाल फेटाळल्या नंतर आता राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार वाकयुद्ध सुरू झाले असून…
Breaking News

Accident News : समृद्धी महामार्गावर अजून एक भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

Posted by - July 2, 2023 0
समृद्धी महामार्गावर अपघातांची (Accident News) मालिका सुरूच असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. समृद्धीवर आज झालेल्या अपघातात आणखी तिघांचा बळी गेला…

युक्रेन येथून जिल्ह्यातील १०२ विद्यार्थी सुखरूप परतले ; जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट

Posted by - March 7, 2022 0
युक्रेन देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्याने भारतातून युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या १०२ विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणण्यात शासन व प्रशासनाला यश आले…
Latur News

Latur News : लातूरमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, अज्ञाताकडून बसवर दगडफेक

Posted by - September 3, 2023 0
लातूर : दोन दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यात (Latur News) उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला होता. यावरून राज्यातील (Latur…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *