Pune Accident News

Pune Accident News : गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पुण्यतील डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू

432 0

पुणे : पुण्यातील (Pune Accident News) मावळ मधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मावळमधील चांदखेड येथे ओढ्यामध्ये कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे एका डॉक्टरला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. डॉ. सत्यजित अर्जुनराव नवाडे (वय 42) असे मृत पावलेल्या डॉक्टरचे नाव आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा दुर्दैवी अपघात झाला आहे.

काय घडले नेमके?
मावळ तालुक्यातील नेरे दत्तवाडी येथे डॉ. सत्यजित नवाडे यांचे हॉस्पिटल आहे. सर्व काम उरकल्यानंतर डॉक्टर चांडखेड येथून कारने बाहेर जात होते. मध्यरात्र असल्याने रस्त्यावर कोणतीही रहादारी नव्हती. त्यामुळे गाडी वेगात होती. मात्र, काही अंतर गेल्यावर चांदखेड गावाजवळ आल्यानंतर डॉ. सत्यजित यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी ओढ्यात कोसळली.

या घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग मित्र लोणावळा, आपदा मित्र मावळ संस्थेचे निलेश गराडे, अजय मुन्हे, अनिश गराडे, कृष्णा गायकवाड, प्रतीक थोरवे, शुभम काकडे, विनय सावंत, विकी दौंडकर, गणेश ढोरे, शिरगाव पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या सर्वांनी अथक प्रयत्नानंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने कार बाहेर काढली. या कारमध्ये डॉ. सत्यजित नवाडे अडकले होते. त्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्या अगोदरच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. डॉ. सत्यजित यांचा अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पुणे हादरलं! मध्यरात्रीच्या सुमारास पाठलाग करून तरुणाची निर्घृणपणे हत्या

Wardha News : तपासणीसाठी आलेल्या मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्याचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू

Share This News

Related Post

Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar : छ. संभाजीनगरमध्ये महिलांकडून समाजसेवकाला बेदम मारहाण

Posted by - July 26, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये काही महिलांनी मिळून समाजसेवकाला बेदम मारहाण…

पुणे : बालकामगार प्रथेविरोधी जन जागृती अभियानाची अमंलबजावणी

Posted by - November 15, 2022 0
पुणे : कामगार विभागाच्यावतीने १४ ते २० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत बालकामगार प्रथेविरोधी जन जागृती अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.…
Accident News

Accident News: बहिणीकडून परतत असताना काळाचा घाला; रक्षाबंधन अगोदर भावाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - August 26, 2023 0
वाशीम : राज्यात अपघाताचे (Accident News) प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. राज्यात दररोज अपघाताच्या (Accident News) अनेक घटना समोर येत…
Pune News

Pune News : पुण्यात आज ओला-उबर, स्विगी-झोमॅटो ‘या’ ऑनलाईन सेवा राहणार बंद

Posted by - October 25, 2023 0
पुणे : पुणेकरांसाठी (Pune News) एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ओला, उबर, स्विगी, झोमॅटो, पोर्टर,…

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

Posted by - January 27, 2022 0
पुणे- राज्यासह पुणे शहरात देखील कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्यानं वाढ होताना दिसून येत आहे. सामान्य नागरिकांपासून ते स्थानिक लोकप्रतिनिधी, बॉलिवूड स्टार्स,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *