पुणे : विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात (Pune News) सध्या गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. काल रात्री मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणाची कोयत्याने निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे.
पुण्यातील गणेश पेठेतील ओसवाल बिल्डिंगच्या छतावर मध्यरात्री ही घटना घडली. सिद्धार्थ नंदकुमार हादगे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.या हत्येप्रकरणी पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतले आहे. सिद्धार्थ आणि आरोपींचे काही कारणावरून वाद झाले होते. आरोपी कोयते घेऊन त्याच्या मागे लागले.
यादरम्यान सिद्धार्थ ओसवाल बिल्डिंगच्या छतावर गेला असता आरोपींनी त्याला एकटे गाठून त्याच्यावर कोयत्याने वार करून त्याची निर्घृणपणे हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Nashik News : गॅस भरताना ओमनी कारचा अचानक झाला स्फोट; चिमुकल्यांसह 10 जण जखमी
Yavatmal News : धक्कादायक ! विजेचा शॉक लागून विद्यूत कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs AUS : वर्ल्ड कपच्या फायनलसाठी पीएम मोदींसह ‘हे’ दिग्गज नेते राहणार उपस्थित