डोळ्यांचे आरोग्य हे खूप महत्त्वाचे आहे. याकडे कधीही दुर्लक्ष करु नये. कारण डोळ्यांना काही झाले तर व्यक्तीला दैनदिन जीवनात अडचणीचा सामना करावा लागू शकतो. सध्या मोतीबिंदूची (Cataracts) समस्या ही अनेकांमध्ये दिसून येत आहे. वाढत्या वयाबरोबर मोतीबिंदूची समस्यादेखील वाढताना दिसत आहे. मोतीबिंदू झाल्यानंतर शस्त्रक्रिया करावी लागते. आज आपण अशा काही पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत जेणेकरून त्यांच्या सेवनाने मोतीबिंदूचा धोका कमी होण्यास मदत होईल.
‘या’ पदार्थांमुळे मोतीबिंदूचा धोका होतो कमी
1. धान्याचे सेवन करा
मोतीबिंदू वेळीच रोखता येऊ शकते. मोतीबिंदू टाळयचा असेल तर तुम्हाला संपूर्ण धान्यांचा आहारात समावेश करावा लागेल. तुम्ही तुमच्या आहारात ब्राऊन राइस आणि गहू यांचा समावेश करू शकता.
2. गाजर खा
गाजर हे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे रोज गाजराचे सेवन केल्यास डोळ्यांच्या समस्या टाळता येतात.
3. फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश
फळे आणि भाज्यांमध्ये असे अनेक पोषक घटक आढळतात जे डोळ्यांसाठी फायदेशीर असतात. रताळे, भोपळा आणि आंबा यांचा आहारात समावेश केल्यास मोतीबिंदूचा त्रास कमी होऊ शकतो. त्यामुळे रोज फळे आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करावा.
4. आंबट फळे
मोतीबिंदूची समस्या टाळण्यासाठी लिंबूवर्गीय फळांचे सेवन करा. ज्यामुळे तुमचे डोळेही निरोगी राहतात. संत्री, लिंबू इत्यादींचे सेवन करु शकता.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune News : पुणे हादरलं! मध्यरात्रीच्या सुमारास पाठलाग करून तरुणाची निर्घृणपणे हत्या
Wardha News : तपासणीसाठी आलेल्या मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्याचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू
Pune Accident News : गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पुण्यतील डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू