पुणे : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर (Mumbai-Pune Expressway) हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत पुणे वाहिनीवर कि.मी 35/500 येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू आहे. त्यामुळे दि. 21 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे.
या दरम्यान नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबईहून पुण्याकडे जाणारी हलकी वाहने द्रुतगती मार्गाच्या कि.मी 08/200 येथील शेडूंग फाटा येथून वळवून रा.म.मा. क्र. 48 जुना मुंबई पुणे महामार्गावरील शिंग्रोबा घाटातून द्रुतगती मार्गाच्या मॅजिक पॉइंट कि.मी. 42/100 येथून पुन्हा द्रुतगती मार्गावरील पुणे वाहिनीवर मार्गस्थ करण्यात येणार आहे. तसेच गॅन्ट्री बसविण्याचे काम पूर्ण झाल्यावर दुपारी 2 वाजता द्रुतगती मार्गावरील मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून देण्यात आली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune News : पुणे हादरलं! मध्यरात्रीच्या सुमारास पाठलाग करून तरुणाची निर्घृणपणे हत्या
Wardha News : तपासणीसाठी आलेल्या मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्याचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू
Pune Accident News : गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पुण्यतील डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू