Satara Accident

Satara Accident : सातारा-पंढरपूर मार्गावर भीषण अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू तर तरुणीचे..

23646 0

सातारा : राज्यात सध्या अपघाताचे (Satara Accident) प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. म्हसवड येथील सातारा-पंढरपूर महामार्गावर मायणी चौकात दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्या पाठीमागे बसलेल्या तरुणीला आपले दोन्ही पाय गमवावे लागले आहेत. अपघात झालेले तरुण तरुणी हे सातारा येथील असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

काय घडले नेमके?
माण तालुक्यातील म्हसवड येथील मायणी चौकात सातारा- लातूर महामार्गावर डंपरने दुचाकीस्वराला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्या मागे बसलेली तरुणी ही गंभीर जखमी झाली. तिला या अपघातात तिचे दोन्ही पाय गमवावे लागले. ही घटना 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता घटना घडली. सातारा येथील अभिषेक जाधव (वय 30) असे मृतकाचे नाव आहे, तर नेहा जयवंत सावंत (वय 27) असे जखमीचे नाव आहे.

लातूर महामार्गावर म्हसवड येथील मायणी चौकात सातारा – लातूर महामार्गावर दुचाकी (क्रमांक एमएच 50 एफ 5755) होन्डा कंपनीची युनिकॉर्न दुचाकी व नंबरप्लेट नसलेला व मुरुम भरलेला डंपर म्हसवडहुन दहिवडीकडे जात असताना मायणी चौकात अचानक डंपरने मायणीकडे जाण्यासाठी वळण घेतले. त्यामुळे दुचाकी जाधव यांच्या डोक्यावरून व नेहा सावंत यांच्या दोन्ही पायावरून डंपर गेल्याने जाधव यांचा जागीच मृत्यू झाला, तर नेहा सावंत ह्या गंभीर जखमी झाल्या. या अपघाताची माहिती मिळताच म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. म्हसवड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

Share This News

Related Post

ऐतिहासिक महात्मा फुले वाड्याच्या कमानीवर चक्क माजी नगरसेविकेच्या सासूच्या नावाचा फलक

Posted by - May 28, 2022 0
पुणे- पुण्यातील ऐतिहासिक महात्मा फुले वाड्याच्या कमानीवर माजी नगरसेविकेच्या सासूच्या नावाचा फलक लावण्यात आला आहे. विविध संघटनांनी याबाबत आक्षेप नोंदवला…

पुणेकरांसाठी लवकरच सुरू होणार कात्रजचे राजीव गांधी प्राणी संग्रहालय

Posted by - March 15, 2022 0
गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे राजीव गांधी प्राणीसंग्रहालय बंद होते. परंतु आता कोरोना ओसरल्यामुळे येत्या 20 मार्च पासून पुणेकरांसाठी राजीव गांधी…
Sushma Andhare

सुषमा अंधारेंनी वारकऱ्यांसाठी लाटल्या चपात्या (Video)

Posted by - June 13, 2023 0
पुणे : सोमवारी हरिनामाच्या गजरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचे पुण्यात आगमन झाले. पुणेकरांनी मोठ्या जल्लोषात या…
Sharad Mohol Murder

Sharad Mohol Murder : शरद मोहोळच्या हत्या प्रकरणी विठ्ठल शेलारला अटक ! हा विठ्ठल शेलार नेमका आहे तरी कोण?

Posted by - January 15, 2024 0
पुणे : काही दिवसांपूर्वी कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याची (Sharad Mohol Murder) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात…
Mira Road Murder Case

मीरा रोड हत्याकांडात आणखी एक धक्कादायक खुलासा; सरस्वतीची आत्महत्या नाही तर हत्याच!

Posted by - June 13, 2023 0
ठाणे : मिरा रोड येथील सरस्वती वैद्य हत्याकांडाच्या तपासात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आरोपीने काही दिवसांपूर्वी सरस्वती वैद्य हिने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *