Accident News

Accident News : ट्रकचालकाकडून झाली ‘ती’ चूक अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब संपलं

405 0

माधोपूर : आपली एक चूक किती महागात पडू शकते (Accident News) याचा प्रत्यय देणारी एक घटना दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर घडली आहे. यामध्ये चुकीचा यू-टर्न घेताना ट्रक आणि कारची धडक झाली. ट्रकने कारला धडक दिल्याने एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अपघातात दोन मुलेही जखमी झाली असून ट्रकचा चालक फरार झाला आहे. ही संपूर्ण अपघाताची घटना त्या ठिकाणी असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?
सवाई माधोपूर जिल्ह्यातील बनास नदी पुलाजवळ रविवारी हा अपघात झाला आहे. सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कार ट्रकच्या मागे जाताना दिसत आहे. अचानक ट्रकने यू-टर्न घेतला आणि त्यामुळे भरधाव वेगाने जाणारी कार त्याला आदळली.पोलिस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच चालकाने घटनास्थळावरून पळ काढला होता. यानंतर पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रक ताब्यात घेतला आहे.

मनीष शर्मा, अनिता शर्मा, सतीश शर्मा, पूनम, संतोष आणि कैलाश अशी या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत. ते सीकर जिल्ह्यातून रणथंबोर येथील त्रिनेत्र गणेश मंदिराकडे जात होते. यादरम्यान हा अपघात झाला. या अपघातात २ मुले जखमी झाली असून त्यांना जयपूरला पाठवण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Maharashtra Politics : विधानपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजलं ! ‘या’ दिवशी होणार निवडणूक

High Court : धाराशिवच्या नामकरणाबाबत उच्च न्यायालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Palghar Crime : धक्कादायक ! 3 महिलांनी केली पोलिसांना बेदम मारहाण

Pune Firing : पुणे पुन्हा हादरलं ! दुचाकीवरून आलेल्या दोघांनी भरवस्तीत केली फायरिंग

Sharad Pawar : ‘निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात’; शरद पवारांचे मोठे वक्तव्य

Jalgaon Crime : जळगावमध्ये भीषण अपघात; 4 जणांचा जागीच मृत्यू

Gunaratna Sadavarte : सदावर्ते दाम्पत्याला मोठा धक्का ! एसटी बँकेतील संचालकपद केले रद्द

Nanded Accident : नांदेडमध्ये ट्रकला वाहनांची धडक बसल्याने भीषण अपघात

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांवर गुन्हा दाखल

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!