Buldhana News

Buldhana News : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर 4 जण जखमी

787 0

बुलढाणा : समृद्धी महामार्ग सुरु झाल्यापासून तिकडे अपघाताचे प्रमाण (Buldhana News) वाढतंच चालले आहे. ते काही थांबायचे नाव घेईना. अशीच एक अपघाताची (Buldhana News) घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. समृद्धी महामार्गावर भरधाव जाणाऱ्या कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार एका पुलाच्या कठड्याला धडकली. या झालेल्या अपघातात एक जण ठार झाला आहे तर 4 जण जखमी झाले आहेत.

काय घडले नेमके?
अमरावतीहून अर्पित बनसोडे, दिनेश बनसोडे, सविता बनसोडे, अश्वजीत बनसोडे, सुरेश बनसोडे हे एम एच 27 डी ए 1927 या क्रमांकाच्या कारने नाशिकच्या दिशेने जात होते. यादरम्यान सिंदखेड राजा जवळ चॅनल क्रमांक 335.9 वर कारचालकाला डुलकी लागल्याने त्याचे कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार महामार्गावरील पुलाच्या कठड्याला धडकली. मध्ये नाशिकचे बनसोडे कुटुंब गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच क्यू आर व्ही चे कर्मचारी अजय पाटील, अनुदीप पवार, परमेश्वर शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन गाडीमधील अपघातग्रस्तांना बाहेर काढले.

Buldhana News : ट्रकला ओव्हरटेक करणे पडले महागात; पोलिस कर्मचाऱ्यासह महिला गंभीर जखमी

यानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी अ‍ॅम्बुलन्सने जालना येथे पाठवण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असताना यातील गंभीर जखमी सुरेश बनसोडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर बाकी अर्पित बनसोडे, दिनेश बनसोडे, सविता बनसोडे यांच्यावर उपचार सुरु आहेत. या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलीस PSI शैलेश पवार पोलीस कर्मचारी नापोकाँ मुकेश जाधव, प्रवीण राणे व महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान भगवान गायकवाड, अजय पाटील, श्रीराम महाजन यांनी अपघातग्रस्त वाहन रस्त्यातून बाजूला हटवून वाहतूक पूर्ववत केली.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!