पुणे : पुण्यातील (Pune News) हायप्रोफाईल ईव्ही पोर्शे कारच्या अपघातातील आरोपीला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. १५ तासानंतर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायालयाने काही अटी व शर्तीनुसार जामीन मंजूर केला आहे. मात्र, याप्रकरणी मुलाच्या वडिलांवर म्हणजे प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक विशाल अग्रवाल यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ब्रम्हा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांच्या मुलाने मध्यरात्री आपल्या भरधाव कारने दोघांना चिरडले. शहरातील कल्याणीनगर येथील परिसरात ही दुर्घटना घडली. या घटनेनंतर संतप्त जमावाने आरोपीला चांगलाच चोप दिला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आरोपी तरुणाला ताब्यात घेतले होते.
न्यायालयाकडून त्यास जामीन मंजूर करण्यात आला आहे. अल्पवयीन असल्यामुळेच त्यास जामीन मंजूर करण्यात आल्याचे समजत आहे. या अपघातात अनिस अवधिया व त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर मृतांच्या नातेवाईकांनी व स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Maharashtra Rain Alert : पुढील 24 तासांत महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस
Loksabha : महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात 13 मतदारसंघात मतदान
Pune News : पुण्यात प्रसिद्ध बिल्डर्सच्या मुलाचा कारनामा; भरधाव कार चालवत दोघांना उडवलं
Pune Crime : पुणे हादरलं ! प्रेयसीने संपर्क तोडल्यावर आरोपीने बहिणीवर केला गोळीबार
Mansoon Update : ‘या’ भागात मान्सून दाखल, हवामान विभागाकडून देण्यात आली माहिती
Manoj Jarange : ‘जर जरांगे पाटील विधानसभेला उभे राहिले तर…’, रावसाहेब दानवेंनी केले मोठे वक्तव्य
Prataprao Bhosale : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
Pune News : पुण्यात आलिशान कारने दिलेल्या धडकेत तरुण-तरुणीचा मृत्यू; कल्यानीनगर मधील घटना
Pune Blast : गॅस चोरी करताना झाला भीषण स्फोट; चाकण-शिक्रापूर परिसर हादरला!