#PUNE CRIME : “इथे धंदा का करतो… ?”असे धमकावून हॉटेल मालकाने केला प्रतिस्पर्धी हॉटेल मालकावर केला धारदार शस्त्राने हल्ला

925 0

पुणे : व्यवसायामध्ये वृद्धी करण्यासाठी सर्वच व्यवसायिक वेगवेगळे मार्केटिंगचे फंडे वापरत असतात. अशातच पुण्यातील एका हॉटेल मालकाने फ्री सूप देण्याचा फंडा सुरू केला होता. आणि तो तितकाच यशस्वी देखील झाला. हॉटेल मधली खवय्यांची रेलचेल वाढली होती पण नेमका याच गोष्टीचा राग येऊन प्रतिस्पर्धी हॉटेल मालकांन कोयत्याने जबरदस्त हल्ला करून या हॉटेल मालकाला जखमी केले आहे.

अधिक वाचा : हृदय पिळवटून टाकणारी घटना : कोल्हापुरात 9 महिन्याच्या बाळाचा गव्हाच्या पिठात पडल्याने श्वास गुदमरून मृत्यू

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, खडकीच्या मेवाड पावभाजीत सेंटर समोर खडकी चौपाटी येथे हा प्रकार घडला. या ठिकाणी ‘ओ शेठ’ नावाचे मुलायम पाल यांचे हॉटेल आहे. त्यांनी आपल्या हॉटेलमध्ये मोफत सूप देण्याची युक्ती लढवली आणि त्यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणावर त्या हॉटेलमध्ये येऊ लागले. याच हॉटेलच्या जवळ असणाऱ्या साहेब नावाच्या हॉटेलला पाल यांच्या या हॉटेलमुळे मोठे नुकसान होऊ लागले.

अधिक वाचा : #VIRAL VIDEO : तुर्कीमध्ये भूकंपाचा हाहाकार ! कोसळलेल्या इमारतीच्या मलब्याखाली आईने दिला बाळाला जन्म; व्हिडिओ होतो आहे व्हायरल…

याचाच राग मनात धरून इथे धंदा का करतो ? असे म्हणून सिद्धार्थ भालेराव आणि दिग्विजय गजरे यांनी मारहाण करायला सुरुवात केली, तसेच त्यांच्या डोक्यात लोखंडी धारदार हत्याराने मारून जखमी केले असल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सिद्धार्थ भालेराव आणि दिग्विजय गजरे यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Share This News
error: Content is protected !!