कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये करवीर तालुक्यात अत्यंत दुखद घटना घडली आहे. एका नऊ महिन्याचे चिमुकले बाळ पिठात पडला. त्यानंतर पीठ तोंडातआणि नाकात अडकल्याने त्याचा श्वास बंद झाला आणि त्यामुळे त्याचा गुदमरून मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, कृष्णराज यमगर (वय ९ महिने) असं मृत्यूमुखी पडलेल्या चिमुकल्याच नाव आहे. करवीर तालुक्यातील वडणगे येथे आजीकडे गेले असताना वॉकर मधून चालत असताना गव्हाच्या पिठाच्या बुट्टीत बाळ तोल जाऊन पडले. त्यावेळी आजीने गव्हाच्या पिठातून त्याला बाहेर काढले पण तोपर्यंत कृष्णराजच्या तोंडात आणि नाकात गव्हाचे पीठ अडकले ते पीठ त्याच्या नाकात आणि तोंडात चिटकल्याने त्याचा श्वास गुदमरला आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे.