#PUNE CRIME : “इथे धंदा का करतो… ?”असे धमकावून हॉटेल मालकाने केला प्रतिस्पर्धी हॉटेल मालकावर केला धारदार शस्त्राने हल्ला

815 0

पुणे : व्यवसायामध्ये वृद्धी करण्यासाठी सर्वच व्यवसायिक वेगवेगळे मार्केटिंगचे फंडे वापरत असतात. अशातच पुण्यातील एका हॉटेल मालकाने फ्री सूप देण्याचा फंडा सुरू केला होता. आणि तो तितकाच यशस्वी देखील झाला. हॉटेल मधली खवय्यांची रेलचेल वाढली होती पण नेमका याच गोष्टीचा राग येऊन प्रतिस्पर्धी हॉटेल मालकांन कोयत्याने जबरदस्त हल्ला करून या हॉटेल मालकाला जखमी केले आहे.

अधिक वाचा : हृदय पिळवटून टाकणारी घटना : कोल्हापुरात 9 महिन्याच्या बाळाचा गव्हाच्या पिठात पडल्याने श्वास गुदमरून मृत्यू

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, खडकीच्या मेवाड पावभाजीत सेंटर समोर खडकी चौपाटी येथे हा प्रकार घडला. या ठिकाणी ‘ओ शेठ’ नावाचे मुलायम पाल यांचे हॉटेल आहे. त्यांनी आपल्या हॉटेलमध्ये मोफत सूप देण्याची युक्ती लढवली आणि त्यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणावर त्या हॉटेलमध्ये येऊ लागले. याच हॉटेलच्या जवळ असणाऱ्या साहेब नावाच्या हॉटेलला पाल यांच्या या हॉटेलमुळे मोठे नुकसान होऊ लागले.

अधिक वाचा : #VIRAL VIDEO : तुर्कीमध्ये भूकंपाचा हाहाकार ! कोसळलेल्या इमारतीच्या मलब्याखाली आईने दिला बाळाला जन्म; व्हिडिओ होतो आहे व्हायरल…

याचाच राग मनात धरून इथे धंदा का करतो ? असे म्हणून सिद्धार्थ भालेराव आणि दिग्विजय गजरे यांनी मारहाण करायला सुरुवात केली, तसेच त्यांच्या डोक्यात लोखंडी धारदार हत्याराने मारून जखमी केले असल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सिद्धार्थ भालेराव आणि दिग्विजय गजरे यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Share This News

Related Post

Chembur Crime News

Chembur Crime News : धक्कादायक ! आरोपीने घरात घुसून महिलेसह तिच्या मुलीवर… चेंबूर हादरलं

Posted by - September 22, 2023 0
मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईतील कल्याणमध्ये आईसोबत जात असलेल्या मुलीची भरदिवसा हत्या केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असताना…

बेळगाव महाराष्ट्राचं की कर्नाटकचं…? आज होणार फैसला ; मराठी भाषिकांचे लक्ष

Posted by - August 30, 2022 0
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून सुरू असलेला बेळगाव, कारवार, निपाणी हा कर्नाटकातील मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात सामील करण्यासाठी अनेक वर्षांचा लढा सुरू…

संभाजीराजेंच्या भाषणानंतर पत्नी संयोगिताराजे का झाल्या भावनाविवश ?

Posted by - February 26, 2022 0
मुंबई- मराठा आरक्षणाच्या मुद्यावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुंबईत बेमुदत उपोषण सुरु केले आहे. ‘मला काहीही झालं तर चालेल पण…
Anurag Thakur

Asian Games : चीनने भारताच्या ‘या’ 3 खेळाडूंवर बंदी घातल्याने अनुराग ठाकूर यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Posted by - September 22, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसांपासून अरूणाचल प्रदेशच्या मुद्द्यावरून चीन भारताला वारंवार डिवचताना दिसत आहे, यामुळे भारत आणि…
Charminar Express

Charminar Express : चारमीनार एक्स्प्रेसचे 3 डबे रुळावरुन घसरले; 5 जण जखमी

Posted by - January 10, 2024 0
हैदराबाद : वृत्तसंस्था – रेल्वे अपघाताची एक मोठी घटना समोर आली आहे. एक्स्प्रेस गाडीचे (Charminar Express) तीन कोच रुळावरुन उतरले.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *