#MAHARASHTRA : अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 फेब्रुवारीपासून ; 9 मार्चला अर्थसंकल्प सादर होणार

675 0

मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार 27 फेब्रुवारी ते 25 मार्च 2023 दरम्यान होणार आहे. या अधिवेशनात सन 2023-24 चा अर्थसंकल्प गुरुवार, 9 मार्च रोजी सादर केला जाणार आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानसभा अध्यक्ष ॲड् राहुल नार्वेकर आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे घेण्यात आली.

या बैठकांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, दूरदृष्यप्रणालीद्वारे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, विधिमंडळ सदस्य सर्वश्री अशोक चव्हाण, एकनाथ खडसे, छगन भुजबळ, जयंत पाटील, ॲड् आशिष शेलार, अनिल परब, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, कपिल पाटील, अमीन पटेल, विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत उपस्थित होते.

बैठकीत 27 फेब्रुवारी ते 25 मार्चदरम्यान होणाऱ्या विधानपरिषद व विधानसभा बैठकांच्या तात्पुरत्या दिनदर्शिकेवर चर्चा करण्यात आली. अधिवेशनाची सुरुवात सोमवार, दिनांक 27 फेब्रुवारी रोजी राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार आहे.

महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये यापुढे प्रत्येक अधिवेशनात पहिल्या दिवशी “वंदे मातरम्’ नंतर “जय जय महाराष्ट्र माझा” हे महाराष्ट्राचे राज्य गीत वाजवण्यात येणार आहे.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवीवर्षानिमित्त अभिवादनाबाबतचा ठराव दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. तसेच जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्च रोजी दोन्ही सभागृहात याबाबत विशेष चर्चा होईल. अर्थसंकल्पावर तीन दिवस तर अर्थसंकल्पीय मागण्यावर सहा दिवस चर्चा करण्यात येणार आहे. विधेयकांपैकी प्रस्तावित विधेयके (मंत्रीमंडळाची मान्यता प्राप्त) 5 आणि प्रस्तावित विधेयके (मंत्रीमंडळाची मान्यता अपेक्षित) 8 अशी अंदाजे 13 विधयके या अधिवेशनात मंजुरीसाठी मांडली जाणार आहेत. दोन्ही सभागृहातील कामकाजासंदर्भात सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली.

Share This News

Related Post

घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीचे लॉकअपमधून पलायन, पाहा व्हिडिओ

Posted by - March 22, 2022 0
पुणे- घरफोडी आणि चोऱ्या करणाऱ्या अटकेतील चोरट्याने चक्क लॉकअपमधून धूम ठोकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना चाकण पोलीस ठाण्यात…
Gulabrao Patil

Gulabrao Patil : आईनंतर आता भावाचेही निधन; मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर

Posted by - November 8, 2023 0
जळगाव : मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मातोश्रींचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्या…

मोठी बातमी : बाराव्या फेरीनंतर 45 हजारांहून जास्त मतं मिळवत ऋतुजा लटके विजयी

Posted by - November 6, 2022 0
मुंबई : मतमोजणीच्या बाराव्या फेरीनंतर ऋतुजा लटके यांना 45 हजारांहून अधिक मतं मिळाल्याने त्या विजयी ठरल्या आहेत. या फेरीनंतर लटके…
Mumbai High Court

OBC Reservation : ओबीसी आरक्षणाच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल; 7 फेब्रुवारीला होणार सुनावणी

Posted by - January 3, 2024 0
मुंबई : ओबीसी आरक्षणाविरोधात (OBC Reservation) हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून त्यावर 7 फेब्रुवारीला मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे सुनावणी निश्चित…

कसबा चिंचवड पोटनिवडणुकीची रणधुमाळी : महाविकास आघाडीचे दिग्गज नेते मैदानात; आज खुद्द शरद पवार तर उद्या आदित्य ठाकरे करणार प्रचार !

Posted by - February 22, 2023 0
पुणे : पुणे आणि चिंचवडमध्ये सध्या पोट निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या दोन्ही जागांवर यापूर्वी भाजपचे आमदार विराजमान होते. कसबा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *