जम्मू काश्मीरमधील उधमपूर शहरातील सलाथिया चौकात एक संशयास्पद स्फोट झाला आहे. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला आहे तर 14 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीनं जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
प्राथमिक माहितीनुसार, आज दुपारी 12.30 वाजता उधमपूरमधील सलाथिया चौकात संशयास्पद स्फोट झाला. भाजीच्या स्टॉलजवळ हा स्फोट झाला असून तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.मात्र, अद्याप त्याची ओळख पटलेली नाही.या संशयित स्फोटात अन्य 14 जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी उधमपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.स्फोटाची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी, लष्कराचे अधिकारी आणि जवानही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला.उधमपूरचे एसएसपी डॉ विनोदही घटनास्थळी पोहोचले आहेत. याशिवाय लष्कराचे अधिकारी आणि जवानांनी घटनास्थळाला तातडीने घेराव घातला आहे. डॉग स्कॉवाडसह लष्कराचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत. एफएसएल टीमनं घटनास्थळावरून स्फोटाचे नमुने गोळा केले आहेत. मात्र हा स्फोट कसा झाला याबाबत सर्व माहिती गोळा करण्यात येत आहे.