पंतप्रधान मोदींनी पुणे मेट्रोचे उद्घाटन केल्यानंतर पुणेकरांसाठी मेट्रो प्रवास सुरू झाला आहे.मेट्रोचा पहिला टप्पा कार्यान्वित झाल्यामुळे कोथरूड मधील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होईल असे मत देखील चंद्रकांतदादा पाटील यांनी मांडले.अनेकांनी मेट्रोचे स्वागत ही केले आहे.
जोशी रेल्वे म्युझियमचे रवी जोशी यांनी मेट्रोच्या स्वागतासाठी मेट्रोच्या प्रतिकृतीचे की-चेन तयार केले असून त्यांच्या छोटेखानी प्रकाशन कार्यक्रम प्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, भाजप प्रवक्ता संदीप खर्डेकर ई मान्यवर उपस्थित होते.
रवी जोशी यांनी, येत्या काही वर्षात मेट्रोचे जाळे शहरभर उभे राहील आणि त्यातून शहरातील वाहतूक कोंडी सुटेल तसेच जोशी रेल्वे म्युझियमचा समावेश पुणे दर्शनच्या स्थळा मध्ये असूनही येथे बस येत नाही अशी खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली व पुण्यातील हे आगळेवेगळे म्युझियम सर्वाना बघायला मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली.