Accident News : वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; 6 महिन्यांच्या चिमुकलीसह 7 जणांचा मृत्यू
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरहून वैष्णोदेवीच्या दर्शनाला जात असलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरने ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक (Accident News) दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 19 जण जखमी झाले आहेत. अंबाला-दिल्ली हायवेवर मोहडाजवळ हा भीषण अपघात झाला. पहाटे 2 च्या सुमारास हा भीषण अपघात झाला.