blast

सिलेंडरचा स्फोट होऊन पुण्यातील वाघोली गोडाऊनला भीषण आग; 3 जणांचा मृत्यू

322 0

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील वाघोली या ठिकाणी असलेल्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये ३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पीएमआरडीए वाघोली व पुणे महानगरपालिकेच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. हि आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

कुठे आणि कधी लागली आग?
पुणे शहरातील वाघोलीत शुक्रवारी रात्री 11.45 वाजताच्या सुमारास उबाळे नगर या ठिकाणी हि आग लागली. “शुभ सजावट” या मंडपाचे साहित्य असणाऱ्या गोडाउनला हि भीषण आग लागली. या आगीमध्ये 4 सिलेंडरचा स्फोट झाल्याने हि आग आणखी पसरली. यानंतर अग्नीशमन दलाच्या 5 तर पीएमआरडीए 4 अशी एकूण 9 अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी तातडीने या आगीवर नियंत्रण मिळवले.

आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू
या भीषण आगीत दुर्देवाने तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. हि आग लागली त्याच्याजवळच 400 सिलेंडरने भरलेले गोडाऊन होते. परंतु योग्य वेळी आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.

Share This News

Related Post

Wanindu Hasaranga

Wanindu Hasaranga : श्रीलंका संघाला मोठा धक्का! वानिंदू हसरंगाची अचानक टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती

Posted by - August 15, 2023 0
श्रीलंकेचा स्टार अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगाने (Wanindu Hasaranga) अचानक टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने स्वतः श्रीलंका क्रिकेट बोर्डाला याची…

RUPALI THOMBARE : “आम्हाला उगाच चिडायला लावू नका; नारायण राणे आणि त्यांच्या पोरांनी आता आवरत घ्यावं…!”

Posted by - October 19, 2022 0
पुणे : काल भास्कर जाधव यांच्या घरावर मध्यरात्री हल्ला करण्यात आला. या घटनेवर राजकीय वर्तुळातून पडसाद उमटत असतानाच पुण्याच्या राष्ट्रवादी…

पुणेकरांना मिळणाऱ्या चाळीस टक्के कर सवलतीचा शासनादेश जारी

Posted by - April 21, 2023 0
पुणेकरांना निवासी मिळकत करामध्ये ४० टक्के कर सवलत २०१९ पासून लागू करण्यात यावी तसेच निवासी व बिगरनिवासी मिळकत करामध्ये २०१०…

मोठी बातमी : MPSC विद्यार्थ्यांची मागणी मान्य, नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू होणार !

Posted by - February 23, 2023 0
पुणे : MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मान्य करण्यात आली आहे. नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *