Pimpri-Chinchwad

Pimpri-Chinchwad : मोठी दुर्घटना ! पिंपरी चिंचवडमध्ये वॅगनर कारवर झाड कोसळले

510 0

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील (Pimpri-Chinchwad) बीएसएनएल मेन एक्सचेंज बिल्डिंग येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये एक भलेमोठे झाड उभ्या असलेल्या मारुती सुझुकी वॅगनर गाडीवर कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
अग्निशमन विभागाला आज सकाळी 11.45 वाजता चिंचवड मधील बीएसएनएल मेन एक्सचेंज बिल्डिंग इथे एक भलेमोठे झाड कोसळले असल्याची माहिती सौ. कल्पना शरद पल्लेवार यांनी दिली. ही माहिती प्राप्त होताच प्राधिकरण उप अग्निशमन केंद्र अग्निशमन वाहन घटनास्थळी रवाना करण्यात आले. घटनास्थळी एम.एच.04 डी जे. 9268, मारुती सुझुकी वॅगनर या गाडीवर झाड पडले होते.

प्राधिकरण उप-अग्निशमन केंद्राचे, मुख्य अग्निशामक विमोचक संजय महाडिक यांनी इलेक्ट्रिक चेन सॉ ने हे झाड कट करून गाडी बाजूला केली. त्यांच्या मदतनीस अनिल माने (अग्निशामक विमोचक), शुभम पिंपळे (ट्रेनि सब ऑफिसर) आणि तेजस पवार (ट्रेनि फायरमन), सौरभ घोरपडे (ट्रेनि फायरमन) होते. हे मदतकार्य संपत गौंड (प्रमुख अग्निशामक विमोचक), यांच्या नियंत्रणाखाली पूर्ण करण्यात आले. या दुर्घटनेत कोणीही व्यक्ती जखमी झालेला नसून गाडीचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Pimpri-Chinchwad : धक्कादायक ! ‘ती’ चूक पडली महागात पती-पत्नीचा भीषण अपघात ; CCTV फुटेज आले समोर

Ajit Pawar : अजित पवारांनी सुनंदा पवार यांच्याबाबत केलेल्या विधानावर सुप्रिया सुळेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Weather Update : महाराष्ट्रात कोसळणार अवकाळी पाऊस ! हवामान खात्याने दिला ‘हा’ नवा अलर्ट

Nashik Loksabha : नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का ! ‘हा’ नेता भरणार अपक्ष उमेदवारी अर्ज

Hemant Godse : नाशिकचा तिढा सुटला ! हेमंत गोडसेंना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर

Hemant Godse : नाशिकचा तिढा सुटला ! हेमंत गोडसेंना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर

Naresh Mhaske : नगरसेवक ते संभाव्य खासदार.. कोण आहेत नरेश म्हस्के?

Kolhapur Crime : कोल्हापूर हादरलं ! पोटच्या मुलाने केली आईची निर्घृणपणे हत्या

Maharashtra Din 2024 : संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये 107 हुतात्म्यांनी गमावले होते आपले प्राण

Maharashtra Politics : महायुतीकडून कल्याण आणि ठाण्याच्या उमेदवारांची नावे जाहीर

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!