नाशिक : नाशिकच्या राजकीय (Nashik Loksabha) वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. दिंडोरी मतदारसंघातून महायुतीकडून भाजप नेत्या डॉ. भारती पवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपकडून त्यांना दुसऱ्यांना तिकीट देण्यात आलं आहे. यामुळे नाराज असलेले भाजप नेते हरिश्चंद्र चव्हाण यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
अपक्ष निवडणूक लढवणार
हरिश्चंद्र चव्हाण हे दिंडोरी मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत. हरिश्चंद्र चव्हाण यांच्या या निर्णयामुळे भाजपच्या अधिकृत उमेदवार भारती पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण बंडखोरी करणार आहेत, ते गुरुवारी दिंडोरी मतदारसंघातून अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.भाजपच्या अधिकृत उमेदवार डॉ. भारती पवार या देखील गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर दुसरीकडे चव्हाण देखील उद्याच आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Hemant Godse : नाशिकचा तिढा सुटला ! हेमंत गोडसेंना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर
Hemant Godse : नाशिकचा तिढा सुटला ! हेमंत गोडसेंना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर
Naresh Mhaske : नगरसेवक ते संभाव्य खासदार.. कोण आहेत नरेश म्हस्के?
Kolhapur Crime : कोल्हापूर हादरलं ! पोटच्या मुलाने केली आईची निर्घृणपणे हत्या
Maharashtra Din 2024 : संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये 107 हुतात्म्यांनी गमावले होते आपले प्राण
Maharashtra Politics : महायुतीकडून कल्याण आणि ठाण्याच्या उमेदवारांची नावे जाहीर