शिवसेनाप्रमुख बाळासाहेब हेच आपले दैवत आहेत. मात्र आपल्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे. माझा लढा हा विठ्ठलाशी नाही तर त्याच्या भोवतालच्या बडव्यांशी आहे, हे शब्द होते राज ठाकरेंचे. जेंव्हा त्यांनी शिवसेना सोडली.बाळासाहेबांच्या डोळ्यादेखत शिवसेनेत फूट पडली आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जन्म झाला.. त्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे पर्व सुरु झालं. 09 मार्च 2006 मध्ये स्थापन झालेल्या मनसेला आज 19 वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने या 19 वर्षात मनसेनं काय कमावलं आणि काय गमावलं याचा आढावा घेणारा TOP NEWS मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट…
मराठी अस्मितेचा मुद्दा हाती घेऊन स्थापन झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठीच्या मुद्द्यावर अनेक आंदोलन केली त्यामुळे आजही जेंव्हा मुद्दा मराठी अस्मितेचा मुद्दा निघतो तेंव्हा महाराष्ट्राला राज ठाकरेच आठवतात. यामागचं कारण म्हणजे मनसेने मराठी अस्मितेसाठी केलेली आंदोलन 2008 आणि 2009 या दोन वर्षांमध्ये राज ठाकरे यांचा वरचष्मा राहिला. 2008 ला रेल्वेमध्ये मराठी पोरांना संधी मिळत नाही म्हणून बिहारी परीक्षार्थीना मारहाण करणं असू दे की परप्रांतीयांच्या विरोधातलं आंदोलन असू दे, हिंदी भाषेच्या सक्तीला केलेला विरोध, उत्तर भारतातील राज्यांमधून येणाऱ्या नागरिकांच्या लोढ्यांना केलेला विरोध, मशिदींवरील भोंगे या प्रत्येक आंदोलनात लाखो मनसेसैनिक राज ठाकरेंच्या मागे उभे राहत होते.
त्यातही सगळ्यात महत्वाचं मराठी पाट्यांचं आंदोलन. महाराष्ट्रातल्या दुकानांवर मराठी पाट्या असल्याच पाहिजेत, असा कायदा असताना कायद्याची अमंलबजावणी का होत नाही असं म्हणत राज ठाकरेंनी एका नव्या मुद्याला हात घातला होता.
या आंदोलनाच्या माध्यमातून मनसेकडे वाढती क्रेज पाहायला मिळत होते आणि त्यानंतर 2009 मध्ये मनसेच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मनसेचे तब्बल 13 आमदार निवडून आले. मात्र पूर्ण मनसेचा बोलबाला सुरू असतानाच मनसेला उतरती कळा लागले आणि 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत मनसेचा केवळ एकच आमदार शरद सोनवणे यांच्या रूपाने निवडून आला पुढे 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील राजू पाटलांच्या रूपाने एकच आमदार निवडून आणण्यात मनसेला यश मिळालं.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत मनसेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला तर विधानसभा निवडणुकीत स्वबळावर मनसेनं 100 हून अधिक जागा वाढविल्या मात्र एकाही जागेवर मनसेला यश आलं नाही. त्यामुळं आता आगामी मनसे कोणत्या मार्गांवर वाटचाल करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.