पुणे शहरात वारंवार विकृती आणि निर्लज्जपणाचे चेहरे समोर येत आहेत. ज्या कृत्यांचं वर्णनही करता येत नाही असं निर्लज्जास्पद वर्तन विकृत करत आहेत.. सातत्याने अशा घटना घडत असताना काही दिवसांपूर्वीच साताऱ्याहून पुण्याकडे येणाऱ्या एसटी बसमध्ये एका प्रवाशाकडून आपल्या बाजूच्या सीटवर बसलेल्या तरुणीसमोर उघडपणे अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या विकृताला अखेर राजगड पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूया यावरचा हा रिपोर्ट
या विकृत चेहऱ्याकडे नीट पहा… या विकृताचं नाव आहे कमलेश शिरसाट… वय 41… या निर्लज्ज नराधमाने धावत्या बसमध्ये तरुणीसमोर लज्जास्पद कृत्य केलंय… हा विकृत सातारा पुणे बसमधील प्रवासादरम्यान शिरवळहून बसला होता.. त्याला उतरायचं होतं कात्रजला.. याच प्रवासा दरम्यान त्याच्या बाजूच्या सीटवर 26 वर्षीय तरुणी बसली होती.. या 41 वर्षीय निर्लज्जाची मध्येच विकृत प्रवृत्ती जागी झाली आणि त्याने अश्लील चाळे करायला सुरुवात केली. ही बाब तरुणीच्या लक्षात येताच तिने लगेचच सावध होत या नराधमाचा व्हिडिओ शूट केला.. हा प्रकार बसमधील वाहक आणि चालकालाही सांगितला.. वाहकाकडे तक्रार केल्याचं या विकृताच्या लक्षात येतात त्याने पुढच्या स्टॉप वर उतरून घेतलं.. मात्र तरुणीने या निर्लज्जा विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.. तरुणीने काढलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून पोलिसांना त्याचा शोध घेण्यास मदत झाली..यासह सातारा ते पुणे महामार्गावरील सुमारे 70 ते 80 सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून अथक प्रयत्नांनी 48 तासांत कमलेश शिरसाट या आरोपीला अटक केली आहे. हा विकृत आरोपी कमलेश शिरसाट पुण्यात आंबेगाव खुर्द येथे राहतो. तो एका कंपनीत शिरवळ या ठिकाणी कामाला आहे. अर्थातच त्याचा दररोज पुणे ते शिरवळ असा बसने प्रवास असायचा.. तो मूळचा ठाणे जिल्ह्यातील बदलापूरचा रहिवासी आहे… आता राजगड पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या असून त्याच्यावर पुढची कारवाई करण्यात आली आहे.
नुकतच पुणे शहरात गौरव अहुजा या तरुणाने भर रस्त्यात लघुशंका करत अश्लील कृत्य केलं.. त्याच्या या कृत्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या घटनेची चर्चा असताना चालत्या बसमध्ये तरुणीसमोर अश्लील चाळे करणाऱ्या निर्लज्ज विकृताला राजगड पोलिसांनी महिला दिनी अटक केली आहे…या घटनेची आणि त्याच्या अटकेबाबतची माहिती राजगड पोलिसांनी दिली आहे
पुणे शहरात वारंवार गुन्हेगारी, अत्याचार, विनयभंग, अश्लील कृत्य या घटनांत वाढ होत आहे. या घटना घडल्यानंतर काही काळ त्याची गंभीरता दाखवली जाते.. मात्र त्यानंतर अशा घटनांबाबत परिस्थिती जैसे थे पाहायला मिळत आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही हे सातत्याने दिसून येत आहे. त्यामुळे कायद्याच्या चौकटीतूनच अशा प्रवृत्तीच्या विकृतांना ठेचणं गरजेचं आहे… यासह सामाजिक दृष्टिकोनातून पोलिसांनी असं विकृत कृत्य करणाऱ्या घटना समोर येणार नाहीत यासाठी चोख बंदोबस्त करण आवश्यक आहे…