मागील अनेक दिवसांपासून गुन्हेगारीने ग्रासलेल्या बीड जिल्ह्यातून आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाटोदा पोलीस ठाण्याच्या बीट अंमलदारानच महिलेवर बलात्कार केल्याने खळबळ उडाली
सद्रक्षणाय खलनिग्रहणाय अर्थात सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या विनाशासाठी हे ब्रीदवाक्य महाराष्ट्र पोलिसांचं आहे. मात्र हे कायद्याचे रक्षकच भक्षक बनले आहेत का असा प्रश्न पडावा अशीही धक्कादायक घटना. महिला दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमासाठी आलेल्या एका महिलेला बोलावून पाटोदा पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार उद्धव गडकर यांनी या महिलेवर बलात्कार केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पाटोदा पोलिसांकडून प्राप्त झालेल्या अधिक माहितीनुसार गेवराई तालुक्यातील ही महिला पाटोदा पोलीस ठाण्यात येजा करत असल्याने बीट अंमलदार उद्धव गडकर यांच्याशी संबंधित महिलेची ओळख झाली मोबाईल क्रमांकाची देवाण-घेवाण झाली यानंतर या दोघांमध्ये संभाषण सुरू होतं आणि याच संधीचा फायदा घेऊन या कर्मचाऱ्यांना महिला दिनाचे निमित्त सांगून त्या महिलेला पाटोदा येथे बोलावून घेतलंआणि तिच्यावर बलात्कार केला संबंधित महिलेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला मात्र तिला चोरीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.
दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही महिला तक्रार दाखल करण्यासाठी पाटोदा पोलीस ठाण्यात येऊन तिने स्वतः पोलीस निरीक्षकांसमोर संपूर्ण आपबीती सांगितली. या घटनेचा गांभीर्य पाहून पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हुनगुडे यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात भेट देत तपासासंदर्भात सूचना केल्या. संबंधित बीट मार्शल पोलीस अधिकाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.