Sharad Pawar

Sharad Pawar : ‘एनडीएमध्ये या’, नरेंद्र मोदींच्या ‘त्या’ ऑफरवर शरद पवारांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया

808 0

नंदुरबार : आज महायुतीच्या उमेदवार हिना गावित यांच्या प्रचारार्थ नंदुरबारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Sharad Pawar) यांनी जाहीर सभा घेतली. या सभेतून पंतप्रधान मोदींनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा एनडीएमध्ये यावं, अशी थेट ऑफर दिली. त्यांच्या या ऑफरवर शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले शरद पवार?
“गांधी, नेहरुंची विचारधारा आमची आहे. हा देश एकसंघ ठेवायचा असेल तर सर्व घटकांना सोबत घेऊन हा देश पुढे न्यावा लागेल. एका समाजाबद्दल वेगळे विचार मांंडले तर देशात ऐक्य राहणार नाही. पंतप्रधान मोदींची भाषणे ऐकली तर ती समाजा- समाजामध्ये गैरसमज पसरवयला पोषक आहेत. हे देशासाठी घातक आहे. आणि देशासाठी घातक असेल तिथे मी किंवा सहकारी राहणार नाही,” असे शरद पवार म्हणाले. “आमचे आरक्षण वाढवायला हरकत नाही. मात्र एखाद्या समाजाबाबत राज्यकर्ते अशी कशी भूमिका घेऊ शकतात. पंतप्रधान हे सगळ्यांचे असतात. ते संपूर्ण देशाचे नेतृत्व करत असतात. अशावेळी त्यांनी एका धर्माचे, भाषेचे विचार करायला सुरूवात केली तर या देशातील ऐक्य संपुष्टात येईल. मगं ते प्रधानमंत्री असो किंवा मंत्रीमंडळातील सदस्य असो,” असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Narendra Dabholkar : दाभोळकरांची ‘हत्या ते न्याय’; कसा होता संपूर्ण घटनाक्रम?

Bajrang Punia : बजरंग पुनियाचे निलंबन; उत्तेजक सेवन चाचणीस नकार दिल्याने केली कारवाई

Narendra Dabholkar : कोण होते नरेंद्र दाभोलकर?

Narendra Dabholkar : नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी मोठी अपडेट ! 2 जणांना जन्मठेप 3 जणांची निर्दोष मुक्तता

Pune News : अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण

Mumbai-Pune Express : मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!