सुरत : सध्या देशात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. लोकसभा (Loksabha) निवडणुकीमुळे सगळीकडे वातावरण तापले आहे. देशात काही ठिकाणी हायव्होल्टेज सामने पाहायला मिळत आहेत. या लढतींकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी भाजप आम्ही या निवडणुकीत 400 पेक्षा अधिक जागा जिंकू असा विश्वास व्यक्त करत आहे. असे असतानाच निकाल जाहीर होण्याआधीच भाजपाला एका जागेवर विजय मिळाला आहे.
VIDEO | Surat District Collector gives Member of Parliament (MP) certificate to BJP's Mukesh Dalal, who was elected unopposed from Surat Lok Sabha seat after all other candidates withdrew from the fray. #LSPolls2024WithPTI #LokSabhaElections2024 pic.twitter.com/0raJgl8RGu
— Press Trust of India (@PTI_News) April 22, 2024
भाजपचा पहिला विजय
या निवडणुकीत सुरत लोकसभेतून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल (Mukesh Dalal) हे बिनविरोध निवडून आले आहेत. या जागेवर काँग्रेसचे उमेदवार निलेश कुम्भानी यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. या जागेवर अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेल्या इतर उमेदवारांनीही आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे या जागेवर निवडणूक लढवणारे मुकेश दलाल हे एकमेव उमेदवार असल्याने ते आता बिनविरोध विजयी झाले आहेत.
दलाल यांच्या विजयाची सुरतच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घोषणा केली आहे. विशेष म्हणजे त्यांना खासदारकीचे पत्रही देण्यात आले आहे. अन्य सर्व उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता दलाल प्रत्यक्ष निवडणूक न लढवताच खासदार झाले आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Sangli Loksabha : सांगलीत मविआला धक्का ! विशाल पाटलांची मनधरणी करण्यात काँग्रेस नेत्यांना अपयश
Vinod Patil : छ. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात आला नवा ट्विस्ट; विनोद पाटलांनी केली ‘ही’ मोठी घोषणा
Loksabha : राष्ट्रवादी अजित पवार गटाचा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध
Jitendra Awhad : खळबळजनक ! आमदार जितेंद्र आव्हाडांना बिश्नोई गँगने दिली धमकी
Google Maps : लोकेशन शेअर करताना आता इंटरनेटची गरज नाही पडणार; लवकरच लॉन्च होणार ‘हे’ फीचर
Nashik News : नाशिकमध्ये मजुरांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात
Weather Update : ‘या’ जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता; हवामान खात्याने दिला पुन्हा अलर्ट
Pune Fire : पुण्यात रविवार पेठेतील भोरी आळीमध्ये दुकानांना भीषण आग
Nagpur Accident : नागपूरमध्ये स्कॉर्पिओचा भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू