Kirit Somayya

Kirit Somaiya : आधी आरोप, आता प्रचार?; भाजपने किरीट सोमय्यांना तोंडघशी पाडलं

465 0

मुंबई : अखेर मुंबईतील सर्व महायुतीचे उमेदवार निश्चित झाले आहेत. तसेच अधिकृतरित्या त्यांची नावं जाहीरही करण्यात आली आहेत. त्यामुळे आता प्रचाराच्या तोफा सुसाट सुटलेल्या आहे. शिंदे गटाने दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव तर उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता विविध नेत्यांकरवी प्रचार सुरू झालाय. त्यातच भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर विरोधकांकडून आणि नागरिकांकडून टीका केली जात आहे. याचं नेमकं कारण काय पाहूया…

ज्या नेत्यांवर सोमय्या यांनी आधी गंभीर आरोप केले होते. त्याच नेत्यांना लोकसभेचे तिकीट मिळाले. उत्तर पश्चिम मुंबई मधून उमेदवार असलेले रवींद्र वायकर यांच्या हॉटेलच्या बांधकामा संदर्भातील अनियमिततेवर सोमय्या यांनी आरोप केले होते. रायगडमध्ये असलेली घरं आणि जोगेश्वरी मधील एका आलिशान हॉटेलच्या बांधकामात अनियमितता आढळल्याचे आरोप वायकर यांच्यावर करण्यात आले होते. त्याचबरोबर ते लवकरच तुरुंगात जातील असं थेट वक्तव्य सोमय्यांनी केलं होतं. पण वायकरांनी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केल्याने या आरोपांच्या चर्चा कमी झाल्या. दुसरीकडे यामिनी जाधव, त्यांचे पति यशवंत जाधव व मुलगा यतिन यांच्यावर आर्थिक अफरातफरीचे आरोप केले होते. यतीन यांची कंपनी शौरुप ट्रेडिंग प्रा. लिमिटेड मध्ये गैरव्यवहार झाले असल्याचं सोमय्या म्हणाले होते. मात्र आता या दोन्ही नेत्यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली आहे.किरीट सोमय्या यांनी आरोप केलेल्या आणि आता तिकीट मिळालेल्या नेत्यांमध्ये नारायण राणे, सुनेत्रा पवार, सुनील तटकरे यांचाही समावेश आहे. राणे भाजपात आल्यामुळे ते क्लिन एंड क्लियर झाले. तर अजित पवार महायुतीत सामील झाल्यामुळे सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरे यांच्यावरचे आरोपही थंडावले.

एकनाथ शिंदे आणि अजित पवार महायुतीत आल्यामुळे भाजपचे फायर ब्रँड नेते म्हणून प्रसिद्ध असलेले किरीट सोमय्या हे मात्र चांगलेच तोंडघशी पडले आहेत. यावरच प्रतिक्रिया देताना सोमय्या म्हणाले की, मी एक छोटासा कार्यकर्ता आहे. मी भ्रष्टाचारा विरोधात केलेल्या कामाचा मला अभिमान आहे. तर पक्षशिस्त आणि पक्षाचा निर्णय मला मान्य आहे, असं बोलून त्यांनी थेट वक्तव्य करणं टाळलं. मात्र आता सोमय्या जर या उमेदवारांचा प्रचार करताना दिसले, तर मतदारही गोंधळात पडतील, यात काही शंका नाही.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची नावे

Murlidhar Mohol : पुण्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यावर भर : मुरलीधर मोहोळ

Pimpri-Chinchwad : मोठी दुर्घटना ! पिंपरी चिंचवडमध्ये वॅगनर कारवर झाड कोसळले

Pimpri-Chinchwad : धक्कादायक ! ‘ती’ चूक पडली महागात पती-पत्नीचा भीषण अपघात ; CCTV फुटेज आले समोर

Ajit Pawar : अजित पवारांनी सुनंदा पवार यांच्याबाबत केलेल्या विधानावर सुप्रिया सुळेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Weather Update : महाराष्ट्रात कोसळणार अवकाळी पाऊस ! हवामान खात्याने दिला ‘हा’ नवा अलर्ट

Nashik Loksabha : नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का ! ‘हा’ नेता भरणार अपक्ष उमेदवारी अर्ज

Hemant Godse : नाशिकचा तिढा सुटला ! हेमंत गोडसेंना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर

Hemant Godse : नाशिकचा तिढा सुटला ! हेमंत गोडसेंना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर

Naresh Mhaske : नगरसेवक ते संभाव्य खासदार.. कोण आहेत नरेश म्हस्के?

Kolhapur Crime : कोल्हापूर हादरलं ! पोटच्या मुलाने केली आईची निर्घृणपणे हत्या

Maharashtra Din 2024 : संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये 107 हुतात्म्यांनी गमावले होते आपले प्राण

Maharashtra Politics : महायुतीकडून कल्याण आणि ठाण्याच्या उमेदवारांची नावे जाहीर

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!