murlidhar mohol

Murlidhar Mohol : प्रदूषणमुक्त हवेसाठी राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार : मुरलीधर मोहोळ

367 0

पुणे : पुणेकरांना प्रदूषणमुक्त, शुद्ध हवा मिळावी यासाठी राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाची (नॅशनल क्लीन एअर प्रोगॅम) प्रभावीपणे अंमलबजावणी करणार असल्याची ग्वाही पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

मोहोळ यांनी वेताळ टेकडीवर सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांची भेट घेतली. माजी नगरसेविका छाया मारणे, अश्विनी जाधव, डॉ. संदीप बुटाला, कैलास पारीख, बाळासाहेब सुराणा, दीपक पवार, मिलिंद तलाठी, गणेश शिंदे, दत्ता गायकवाड, बाळासाहेब खंकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोहोळ म्हणाले, “केंद्र सरकारने शहरांमधील वायू प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी देशातील शंभरहून अधिक शहरांत हा कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात पुणे, खडकी, पिंपरी-चिंचवड आणि देहू रोड कॅन्टोन्मेंट बोर्डाला पहिल्या टप्प्यासाठी 504 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. 2026 पर्यंत वायू प्रदूषण 25 ते 30 टक्क्यांपर्यंत कमी ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या अंतर्गत पुण्याला 135 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.”

मोहोळ पुढे म्हणाले, “सूक्ष्म धुलिकणांचे आणि अतिसूक्ष्म धुलिकणांचे प्रमाण कमी करायचे आहे. त्यासाठी पाणी शिंपडणारी कारंजी उभारणे, स्मशानभूमींमध्ये विद्युतदाहिन्या, गॅसदाहिन्यांची संख्या वाढवणे, विद्युत वाहनांची संख्या वाढविणे, वाहतूक कोंडी कमी करणे, रस्ते सफाईच्या कामात सुधारणा आणणे, सार्वजनिक वाहतुकीस प्रोत्साहन देणे, मेट्रोसाठी फीडर म्हणून 300 मिडी बसची खरेदी करणे आदी उपाययोजना करण्यात येणार आहेत. या उपायांची प्रभावी अंमलबजावणी करणार असून, पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्राकडून अधिकाधिक निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.”

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Accident News : छ. संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला ट्रॅक्टरनं चिरडलं

Pune News : पुण्यात उष्णतेचा कहर;स्विफ्ट कारला लागलेल्या आगीत कार जळून खाक

Sonal Gondane : वंचित बहुजन आघाडीकडून मुंबई उत्तरमधून सोनल गोंदाने यांना उमेदवारी जाहीर

Shantigiti Maharaj : नाशिकमध्ये मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी ‘या’ पक्षाकडून भरला उमेदवारी अर्ज

Srinivasa Prasad : भाजपचे माजी केंद्रीय मंत्री व्ही.श्रीनिवास प्रसाद यांचे निधन

Raj Thackeray : राज ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार

Pune Crime News : धक्कादायक ! स्वारगेट परिसरात आरोपीकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Narendra Modi : 2 दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये मोदींच्या होणार 6 सभा

Maharashtra Politics : काँग्रेसला आणखी एक धक्का ! ‘या’ नेत्याने सोडला काँग्रेसचा हात

Weather Update : विदर्भात कोसळणार अवकाळी पाऊस ! हवामान खात्याने दिला इशारा

Share This News

Related Post

सुपरस्टार रजनीकांतनं घेतली उद्धव ठाकरेंची भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात

Posted by - March 18, 2023 0
साऊथचा सुपरस्टार रजनीकांत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. उद्धव…
Jail

Independence Day : स्वातंत्र्यदिनी राज्यातील 186 कैद्यांची कारागृहातून होणार सुटका; केंद्रीय गृह सचिवाकडून माहिती

Posted by - August 12, 2023 0
मुंबई : मंगळवारी (15 ऑगस्ट) देशाचा 76 वा स्वातंत्र्यदिन (Independence Day) साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन…

सावित्रीबाई फुले कृतीशील समाजसुधारक, दृष्ट्या शिक्षणतज्ज्ञ- देवेंद्र फडणवीस (व्हिडिओ)

Posted by - February 14, 2022 0
पुणे – ज्योतिबांच्या कामाला सावित्रीबाईंनी सामाजिक साथ दिली. त्या स्वतःही कृतीशील समाजसुधारक, दृष्ट्या शिक्षणतज्ज्ञ होत्या. ज्योतिराव गेल्यांनंतर त्यांनी त्यांच्या अनुयायांचे…
PMPML

Pune Traffic Update: दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील पीएमपीच्या वाहतुक मार्गात बदल

Posted by - September 6, 2023 0
पुणे : पुण्यात दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा केला जातो. उद्या गुरुवारी पुण्यात दहीहंडीचा थरार (Pune Traffic Update) पुणेकर अनुभवणार आहेत.…

SPECIAL REPORT : महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेने काय गमावलं,काय कमावलं ?

Posted by - November 21, 2022 0
काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 7 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या भारत जोडो नुकतीच महाराष्ट्रातून मध्यप्रदेशच्या दिशेने रवाना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *