Narendra Modi

Narendra Modi : 2 दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये मोदींच्या होणार 6 सभा

276 0

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांच्या वातावरणात आजचा दिवस प्रचाराच्या दृष्टीने वादळी असणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आजपासून पुढील 48 तासांमध्ये राज्यात 6 महत्वाच्या प्रचार सभा घेणार आहेत.

मोदींचे ‘या’ मतदारसंघां मध्ये झाल्या सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदींने देशभरात प्रचार सभांचा धडाका लावला असून मोदींचे विशेष लक्ष महाराष्ट्रावर असणार आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात पूर्व विदर्भातल्या 5 जागांसाठी मतदान पार पडले असून यात मोदींने चंद्रपूर, रामटेक आणि वर्ध्यात प्रचार सभा घेतल्या होत्या. दुस-या टप्प्यासाठी मोदींने नांदेड, परभणी, अमरावतीत सभा घेतल्या होत्या. आता मोदींचे लक्ष राज्यातल्या उर्वरित तीन टप्प्यातल्या लोकसभा मतदारसंघांकडे आहे.

पुढील 48 तासात ‘या’ मतदारसंघां मध्ये होणार सभा-
नरेंद्र मोदी आज सोलापूर मतदारसंघामधील महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या पप्रचारार्थ दुपरी दीड वाजता होम मैदान येथे सभा घेणार आहेत. त्यानंतर दुपारी पावणेचार वाजता पंतप्रधान मोदी भाजपाचे सातारा मतदारसंघांमधील राज्यसभेचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसलेंच्या प्रचारार्थ कराडमध्ये सभा घेणार आहेत.

एका सभेतून पुण्यातील चार उमेदवारांचा प्रचार-
पुण्याचे माजी महापौर आणि महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, मावळ मतदारसंघाचे उमेदवार श्रीरंग बारणे, बारामती मतदारसंघाचे उमेदवार सुनेत्रा पवार आणि शिरुर मतदारसंघाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी हडपसरमधील रेसकोर्स मैदानावर संध्याकाळी पावणेसहा वाजता मोदी सभा घेणार आहेत. मोदींची पुण्यातील सभा ही 4 उमेदवारांच्या प्रचारासाठी असणार आहे.

तसेच ३० एप्रिल रोजी पंतप्रधान मोदी माळशिरस, धाराशिव आणि लातूरमध्ये प्रचारसभा घेणार असून माढा मतदारसंघाचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी माळशिरस येथे दुपारी पावणेबारा वाजता प्रचारसभा घेणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान मोदी अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी धाराशिव मतदारसंघात दुपारी दीड वाजता सभा घेणार आहेत. लातुर मतदारासंघाचे उमेदवार सुधाकर श्रंगारे यांच्या प्रचारासाठी मोदी मंगळवारी दुपारी तीन वाजता सभा घेणार आहेत.

याशिवाय, 6 मे रोजी पंतप्रधान मोदींची सभा बीड मतदारसंघाचे उमेदवार पंकजा मुंडें यांच्या प्रचारासाठी मोदी सभा घेणार आहेत. त्यानंतर 10 मे रोजीही पंतप्रधान मोदी कल्याण मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे, अहमदनगर मतदारसंघाचे उमेदवार सुजय विखे पाटील आणि दिंडोरी मतदारसंघाचे उमेदवारांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी सभा घेणार आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maharashtra Politics : काँग्रेसला आणखी एक धक्का ! ‘या’ नेत्याने सोडला काँग्रेसचा हात

Weather Update : विदर्भात कोसळणार अवकाळी पाऊस ! हवामान खात्याने दिला इशारा

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!