Raj Thackeray

Raj Thackeray : राज ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार

387 0

ठाणे : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांना ठाण्यात मोठा धक्का बसला आहे. राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. तर दुसरीकडे शहापूरमधील मनसे कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसत आहेत. महाविकास आघाडीच्या प्रचार रॅलीमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांकडून जेसीबीनं फुलांची उधळण करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

काय घडले नेमके?
भिवंडी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सुरेश म्हात्रे यांच्या प्रचार दौऱ्याची सुरुवात शहापूर तालुक्यातून करण्यात आली, यावेळी म्हात्रे यांची शहापूर शहरात एन्ट्री होताच मनसेचे कार्यकर्ते संतोष शिंदे यांच्यासह तब्बल 300 कार्यकर्त्यांनी म्हात्रे यांच्यावर जेसीबीमधून फुलांची उधळण करत त्यांचं जोरदार स्वागत केलं. आम्ही जरी मनसेचे कार्यकर्ते असलो तरी देखील आम्ही सुरेश म्हात्रे यांचे समर्थक आहोत. त्यामुळे आमचा पाठिंबा म्हात्रे यांनाच असणार आहे, असं कार्यकर्त्यांनी स्पष्ट केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Crime News : धक्कादायक ! स्वारगेट परिसरात आरोपीकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Narendra Modi : 2 दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये मोदींच्या होणार 6 सभा

Maharashtra Politics : काँग्रेसला आणखी एक धक्का ! ‘या’ नेत्याने सोडला काँग्रेसचा हात

Weather Update : विदर्भात कोसळणार अवकाळी पाऊस ! हवामान खात्याने दिला इशारा

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!