‘द कश्मीर फाइल्स’ची जोरदार कमाई

455 0

बहुचर्चित विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. अवघ्या दोन दिवसात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करीत 12 कोटी रुपयांचा गल्ला जमविला आहे.

चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी नुकतीच ट्विटरवर याबाबतची माहिती शेअर केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी शुक्रवारी 11 मार्चला 3.55 कोटींची कमाई केली तर दुसऱ्या दिवशी 8.50 कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 12.5 कोटींची कमाई केली आहे. दरम्यान काही दिवसात या चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होईल असा अंदाज वर्तविला जात आहे.

दरम्यान या चित्रपटाची अनेक समीक्षकांनी स्तुती केली आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी आणि चिन्मय मांडलेकर यांसारखे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

Share This News

Related Post

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मिर फाईल्स’ चित्रपटाची विक्रमी कमाई

Posted by - March 23, 2022 0
विवेक अग्निहोत्रीचा ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान धुमाकूळ घालत असून अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित…

ग्राहकांना बसणार झटका ! १२ टक्क्यांपर्यंत प्रीपेड प्लॅन्सच्या किंमती वाढण्याची शक्यता

Posted by - May 24, 2022 0
मुंबई- रिलायन्स जिओ, व्होडाफोन आयडिया आणि एअरटेलसारख्या खासगी दूरसंचार कंपन्या आपल्या ग्राहकांना पुन्हा एकदा झटका देण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या सुमारास…
IFFI

IFFI : गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘या’ 3 मराठी चित्रपटांची निवड; सुधीर मुनगंटीवारांची घोषणा

Posted by - November 2, 2023 0
मुंबई : गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार विभागासाठी (IFFI) यावर्षी महाराष्ट्र सरकारकडून तीन मराठी सिनेमांची निवड करण्यात आली. यासंदर्भात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *