गेले 2 -3 वर्षा पासून मराठा समाजला आरक्षन हे महविकास आघाडी सरकारने अजून दिले नाही.महानगरपालिका निवडणूका या जवळ आल्या तरी मराठा समाजला आरक्षन हे भेटले नाही.त्यावर मराठा समाज हा अजूनही नाराज आहे.
त्यावर मविआ सरकारनेच मराठा आरक्षण घालवलं.त्यामुळे ते पुन्हा मिळवून देण्याची जबाबदारी ही सरकारचीच आहे .आता पुन्हा मराठा आरक्षण मिळवायचं असेल .तो विषय राज्य मागासवर्ग आयोगाकडे सोपवावा.अशी मागणी पुण्यातील पत्रकार परिषदेत शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष व आमदार विनायक मेटे यांनी केली.
या पत्रकार परिषदेला शिवसंग्रामचे प्रवक्ते तुषार काकडे व शिवसंग्राम पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
विनायक मेटे म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत सरकार काहीच हालचाल करत नाही.
राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचे सर्वेक्षण करून सरकार कडे अहवाल सादर करावा.अशी मागणी विनायक मेटे यांनी केली.
विनायक मेटे म्हणले आम्ही येथील पुढील दिवसात
राज्य मागासवर्ग आयोगाकडे शिवसंग्राम मराठा आरक्षणासाठी रितसर अर्ज करणार आहोत असे विनायक मेटे म्हणाले.
ओबीसी समाजाला पण अजून आरक्षण भेटले नाही. त्यावर विनायक मेटे म्हणाले,ओबीसी राजकीय आरक्षणाचाही सरकारने घोळ घातलाय. असे मेटे म्हणाले.