JEE ची परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. JEE मुख्य सत्र-1 च्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.कोणत्या आहेत तारखा जाणून घेऊया.
यापूर्वी ही परीक्षा 16 ते 21 एप्रिल या कालावधीत होणार होती. सुधारित वेळापत्रकानुसार, परीक्षा आता 21, 24, 25, 29 एप्रिल आणि 01, 4 मे रोजी होणार आहे.फक्त सत्र 1 च्या परीक्षेच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत.
नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA ने या सत्रासाठी जेईई मेन 2022 परीक्षेच्या तारखा बदलल्या आहेत.जे विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत, त्यांनी अधिकृत वेबसाइटवर प्रसारीत केलेली नोटीस त्वरित तपासावी. NTA ने फक्त सत्र 1 च्या परीक्षेच्या तारखा बदलल्या आहेत. परीक्षेच्या सुधारित तारखा देखील वेबसाइटवर देण्यात आल्या आहेत.
प्रसारीत केलेल्या नोटीसमध्ये, एनटीएने स्पष्ट केले आहे की परीक्षेची तारीख अनेक बोर्ड परीक्षांच्या तारखांशी जुळत होती. त्यामुळेच विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन परीक्षेच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत.