Hemangi Kavi

Hemangi Kavi on Jhimma 2: ‘झिम्मा 2’पाहून हेमांगी कवीने दिग्दर्शकाला केली ‘ही’ विनंती; पोस्ट व्हायरल

661 0

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा 2’ हा चित्रपट सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद (Hemangi kavi on Jhimma 2) मिळताना दिसत आहे. मराठी कलाकारांसोबत समीक्षकांनीदेखील या चित्रपटाचे कौतुक केले आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालताना दिसत आहे. अनेक कलाकार देखील हा चित्रपट पाहून प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.अभिनेत्री हेमांगी कवीने नुकतीच यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. या पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

काय आहे हेमांगी कवीची पोस्ट?
हेमांगी झिम्मा 2 पाहुन लिहीते, “मला तर बाई लय मंजी लय मज्जा आली! हेमंत ढोमे अरे काय कमाल सिनेमा आहे! Frankly speaking झिम्मा 1 पेक्षा झिम्मा 2 जास्त जमून आलाय. कदाचित या बायकंना आम्ही झिम्मा 1 पासून ओळखत होतो म्हणून हे मला वाटलं असेल. प्रत्येकीची गोष्ट वेगळी पण तितकीच प्रभावी आणि relatable! विचार करायला लावणारी आणि आचरणात आणायला कुठेही कठीन न करता सहजपणे आपल्यात बदल करू शकणारी! खरंच मज्जा आली. प्रचंड enjoy केला मी हा सिनेमा!”

“निर्मीती सावंत!!!! काय करायचं या बाईचं! म्हणजे मला काही सुचेचना! कसं कसं करतेस गं तू! इतक्या वर्षांपासून कसं गं हे अबाधित ठेवलंयस? आपल्याकडे विशिष्ट वयानंतर अभिनेत्रीला lead किंवा Heroine म्हणून बघितलं जात नाही. पटकन चरित्र कलाकार, सहाय्यक कलाकार म्हणून आपण लगेच categories करतो. Hollywood किंवा इतर कुठेही असं होत नाही. मोठ्या वयाच्या अभिनेत्रींना Lead म्हणूनच पाहीलं जातं. Awards साठी main category मध्ये गणलं जातं. ही गोष्ट जर आपल्या इथं सुरू झाली तर त्याला तु कारणीभूत असशील ताई. इतकं भारी काम केलंयस तू! सुहास ताई, हीच गोष्ट ‘तु तिथं मी’ च्या वेळी वाटली होती. आणि आज ही तुमची इंदू पाहून वाटलं! तो line मारायचा scene! मी तर शिट्टीच हाणली theatre मध्ये. क्या बात है!”

रिंकूचे कौतुक करत हेमांगी म्हणाली, रिकुचं दुसरं कौतुक करावंसं वाटतं. खुप समजून- उमजून काम केलंय. Typical सून न करता एकदम छान तान्या साकारली आहे. Screen वर दिसताच आपसूक आमच्या चेहऱ्यावर smile येत होतं. थोडक्यात या सासू-सूनेने लयच धमाल आणलीए! एक एक scene चोपलाय तिघींनी! जाता जाता एवढंच सांगेन हेमंत ढोमे आता आम्हाला झिम्मा 3 हवाय. हवाय म्हणजे हवायययययय! ते तू बाकी सिनेमे करत रहा पण झिम्मा universe ला अंत देऊ नकोस! फार फार तर काय होईल एखादा part फसेल! ठिक आहे की. पण हा खेळ थांबवू नकोस एवढीच विनंती तुझ्या सगळ्या team कडे. इरावती कर्णिक – क्षितीज पटवर्धन कमाल कमाल! कमाल!”

दिग्दर्शक हेमंत ढोमेचा ‘झिम्मा’ हा चित्रपट एक वर्षापूर्वी प्रदर्शित झाला होता. चित्रपटाने बॅाक्स ॲाफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्यापाठोपाठ ‘झिम्मा 2’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकु राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर हे प्रमुख कलाकार आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Weather Update: राज्यात आजही कोसळणार पाऊस; ‘या’ भागांत विजांच्या कडकडाटासह वादळाचा इशारा

Dr. Vinayak Kale : ससूनच्या अधिष्ठातापदी डॉ. विनायक काळे यांची नियुक्ती

Sanjay Raut : राज्यात नामर्दांचं सरकार, गद्दारांसाठी वेगळा कायदा; संजय राऊत यांची सरकारवर टीका

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी घातला टीपू सुलतानच्या फोटोला हार; Video व्हायरल

Wardha Accident : वर्ध्यात कार आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात

Viral Video : खतरनाक ! पिसाळलेल्या बैलाने घरात घुसून महिलांना उडवले

Share This News

Related Post

ह्या कारणामुळे नीना गुप्ता यांनी ‘वध’ चित्रपट करण्यास दिला होकार; निर्मात्यांनी शेअर केला चित्रपटाचा BTS व्हिडिओ

Posted by - December 4, 2022 0
बहुप्रतिक्षित आगामी क्राईम थ्रिलर ‘वध’ या चित्रपटात संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांना पहिल्यांदाच एका फ्रेममध्ये पाहायला मिळणार असल्याने याची…

दिग्दर्शक केदार शिंदे यांचं ‘झुंड’ विषयीचे ट्विट चर्चेत ; प्रेक्षकांना केलं झुंड पाहण्याचं आवाहन

Posted by - March 7, 2022 0
नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड चित्रपट नुकताच 4 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाच्या निमित्तानं अमिताभ बच्चन यांनी कोरोना महामारी…

सायंकाळी 7 वाजता लग्नानंतर रणबीर-आलिया प्रसारमाध्यमांसमोर येणार

Posted by - April 14, 2022 0
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट गुरुवारी संध्याकाळी 7  च्या सुमारास मीडियासमोर येणार आहेत. लग्नाची वेळ दुपारी 2 वाजताची आहे. आलिया…

अभिनेत्री व्हीजे महालक्ष्मी आणि निर्माता रवींद्र चंद्रशेखर अडकले विवाह बंधनात ; लग्नातील फोटोंवरून सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस

Posted by - September 2, 2022 0
दक्षिणात्य अभिनेत्री व्हीजे महालक्ष्मी आणि निर्माता रवींद्र चंद्रशेखरन हे नुकतेच विवाह बंधनात अडकले आहेत. कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत त्यांनी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *