मुंबई : नव्या वर्षात म्हणजे 2024 मध्ये (T20 World Cup 2024) खेळवल्या जाणाऱ्या टी20 विश्वचषकात खेळणारे 20 संघ निश्चित निश्चित झाले आहेत. यामध्ये आश्चर्यकारक म्हणजे युगांडा (Uganda) क्रिकेट संघाने पहिल्यांदा आयसीसी स्पर्धेत (ICC Tournament) प्रवेश केला आहे. आयसीसी पुरुष टी20 विश्वचषकात सहभागी होणारा युगांडा हा पाचवा आफ्रिकी देश ठरला आहे. आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत युगांडा संघाचा पहिलाच प्रवेश आहे. युगांडाबरोबरच नामिबियानेही पुरुष टी20 विश्वचषकात प्रवेश केला आहे. नामिबियाची ही तिसरी वेळ आहे.
‘हे’ 20 संघ खेळणार टी- 20 विश्नचषक
टी – 20 विश्वचषकासाठी 20 संघ निश्चित झाले आहेत. यामध्ये भारतासह पाकिस्तान, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड, श्रीलंका, वेस्टइंडिज, अमेरिका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलँड, पपुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, युगांडा, नामिबिया आणि ओमान या संघांचा समावेश आहे.
‘या’ फॉरमॅटमध्ये खेळावला जाणार आयसीसी टी- 20 विश्नचषक
जून 2024 च्या पहिल्या आठवड्यात टी20 विश्वचषकाला सुरुवात होईल आणि 30 जूनाल अंतिम सामना खेळवला जाणार आहे. स्पर्धेत सहभागी असलेल्या वीस संघांचे प्रत्येकी पाच प्रमाणे 4 ग्रुप बनवले जातील. प्रत्येक ग्रुपमधील टॉपला असलेला संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करेलं. पहिल्या आणि चौथ्या संघामध्ये सेमीफायनलाच पहिला सामना होईल. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघामध्ये सेमीफायनलचा दुसरा सामना खेळवला जाईल. या स्पर्धेत एकूण 55 सामने खेळवले जातील.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Weather Update: राज्यात आजही कोसळणार पाऊस; ‘या’ भागांत विजांच्या कडकडाटासह वादळाचा इशारा
Dr. Vinayak Kale : ससूनच्या अधिष्ठातापदी डॉ. विनायक काळे यांची नियुक्ती
Sanjay Raut : राज्यात नामर्दांचं सरकार, गद्दारांसाठी वेगळा कायदा; संजय राऊत यांची सरकारवर टीका
Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी घातला टीपू सुलतानच्या फोटोला हार; Video व्हायरल
Wardha Accident : वर्ध्यात कार आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात
Viral Video : खतरनाक ! पिसाळलेल्या बैलाने घरात घुसून महिलांना उडवले