Kolhapur

नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी पूजा करत असताना अचानक वडाच्या झाडाने घेतला पेट (Video)

862 0

कोल्हापूर : आज महाराष्ट्रभरात ठीकठिकाणी वटपौर्णिमेचा (Vatpurnima) सण साजरा केला जात आहे. या सणानिमित्त महिला वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या आरोग्यदायी आणि दीर्घायुष्याची मागणी करतात. सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये वटपौर्णिमा करताना वडाच्या झाडाला गुंडाळलेल्या दोऱ्याला आग लागल्यामुळे झाडाने पेट घेतल्याचे दिसत आहे.

ही घटना कोल्हापूरातील अंबाबाई मंदिरातील (Ambabai Temple) आहे. या घटनेनंतर सुरक्षा रक्षकांनी तात्काळ धाव घेत ही आग विझवली. आज वटपौर्णिमाचा सण असल्याने अंबाबाई मंदिरात महिलांची मोठी गर्दी जमा झाली होती. यादरम्यान एका महिलेने झाडावर पेटता कापूर टाकला. यामुळे झाडाने पेट घेतला. या घटनेनंतर सर्व महिलांना झाडाजवळून लांब करण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Share This News
error: Content is protected !!