Manjushri Oak

कौतुकास्पद ! पुण्याच्या मंजुश्री ओकची ‘गिनीज बुक’मध्ये नोंद; काय आहे रेकॉर्ड ?

539 0

पुणे : गायिका मंजुश्री ओक (Manjushree Oak) यांनी देशातील विविधतेतील एकात्मतेचे दर्शन घडविण्यासाठी भारतातील 121 भाषा, बोलीभाषा आणि उपभाषांमध्ये सलग साडेतेरा तास गाण्यांचे सादरीकरण करून जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. ओक यांनी सादर केलेल्या ‘अमृतवाणी – अनेकता मैं एकता’ या कार्यक्रमाची ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये नोंद करण्यात आली आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये (Yashwantrao Chavan Theatre) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

गायिका मंजुश्री ओक यांनी यापूर्वी 2017 आणि 2018 अशी सलग दोन वर्षे ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्’ (India Book of Records) व ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये (Asia Book of Records) प्रत्येकी दोन विक्रम नोंदविले आहेत. या विक्रमाबद्दल विचारले असता ‘लहानपणापासून अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत असताना संगीत क्षेत्रातील प्रयत्नांद्वारे देशासाठी काही तरी योगदान द्यावे, हा विचार मनात होता. याच दृष्टीने प्रयत्न करीत असताना ‘श्री यशलक्ष्मी आर्ट’तर्फे आणि पद्मनाभ ठकार यांच्या सहकार्याने ‘अमृतवाणी – अनेकता मैं एकता’ हा कार्यक्रम केला,’ असे ओक यांनी सांगितले.

तसेच गाण्यांमध्ये पारंपरिक गीते, लोकगीते, भक्तिगीते, भावगीते, अभंग, देशभक्तिपर गीते; तसेच लावणीला सामावून घेतले. देशातील ही विविधता भाषा आणि गाण्यांच्या स्वरूपात जगापर्यंत पोहोचावी, या उद्देशाने मी हा विक्रम करण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी ठरला,’ अशी भावना ओक यांनी यावेळी व्यक्त केली.

Share This News

Related Post

Breaking : इयत्ता बारावीचा निकाल गुरुवारी लागणार, ‘या’ संकेतस्थळावर पाहता येणार निकाल

Posted by - May 24, 2023 0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता बारावीच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. उद्या गुरुवारी दि. २५…

भारतात 14 नोव्हेंबरलाच का साजरा करतात बालदिन? ‘हे’ आहे खास कारण

Posted by - November 14, 2022 0
लहान मुलं ही देवाघराची फुलं असं म्हटलं जातं. लहान मुलांना देवाचे रूपही मानले जातं. अनेक देशांमध्ये 20 नोव्हेंबर रोजी बालदिन…

CM EKNATH SHINDE PRESS CONFERENCE : “दिल्लीत येण्यास कारण की…” (Video)

Posted by - July 19, 2022 0
दिल्ली : राज्यातील राजकीय उलथापालथीनंतर आता शिवसेनेला थेट केंद्रातही मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे 12 खासदार आज शिंदे गटामध्ये सामील…

#MAHARASHTRA POLITICS : राज्यपालांनी शिंदे यांना सरकार स्थापन करण्यासाठी बोलवले होते का? सरन्यायाधीशांनी शिंदे गटाच्या वकिलांना विचारले हे प्रश्न; सुनावणीत आज दिवसभरात काय झाले वाचा

Posted by - March 1, 2023 0
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात आजच्या दिवसाची सुनावणी संपली. बुधवारी दिवसभर शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी युक्तिवाद केला. आता…
Ravindra Dhangekar

Pune Loksabha : पुणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल

Posted by - May 14, 2024 0
पुणे : पुण्यातून (Pune Loksabha) एक मोठी बातमी समोर येत आहे. पुणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *