गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे राजीव गांधी प्राणीसंग्रहालय बंद होते. परंतु आता कोरोना ओसरल्यामुळे येत्या 20 मार्च पासून पुणेकरांसाठी राजीव गांधी प्राणीसंग्रहालय खुले करण्यात येत आहे.
दोन वर्षापासून कोरोनामुळे राजीव गांधी प्राणीसंग्रहालय बंद होते. परंतु आता कोरोना ओसरल्यामुळे येत्या 20 मार्च पासून पुणेकरांसाठी राजीव गांधी प्राणीसंग्रहालय खुले करण्यात येत आहे.प्राणिसंग्रहालयात आता आणखी तीन नवे पाहुणे जंगल कॅट, लेपर्ड व शेकरू पाहायला मिळणार आहे. तर तीन महिन्यानंतर तरस आणि चौशिंगाचे ही दर्शन होणार आहे.वाघ, सिंह, बिबट्या, हत्ती, अस्वल, हरीण, गवा, कोल्हा, लांडगा आदी प्राणी पाहता येणार आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये नवीन प्राण्यांसाठी खंदक तयार केले आहेत. भविष्यात तरस, चौशिंगा, झेब्रा आणण्यात येणार असून त्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.