आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात राजकीय नेत्यांचे फोन टॅप केल्याप्रकऱणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालात रश्मी शुक्ला दोषी आढळल्यानंतर त्यांच्या विरोधात पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
बंडगार्डन पोलीस ठाण्यात रश्मी शुक्ला यांच्या विरोधात दाखल एफआयार रद्द करण्यासाठी शुक्ला यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्या विरोधात बंडगार्डन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे, हा गुन्हा रद्द व्हावा यासाठी रश्मी शुक्ला यांनी न्यायालयात धाव घेतली होती.रश्मी शुक्ला यांनी गुन्हा दाखल होताच मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. रश्मी शुक्ला यांच्यावर 25 मार्चपर्यंत कठोर कारवाई करु नका, अशा सूचना उच्च न्यायालयानं दिल्या आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले, संजय काकडे, आशिष देशमुख, बच्चू कडू यांचे फोन टॅप करण्यात आले होते. त्याचा अहवाल मिळाल्यानंतर रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांना दिलासा मिळाला आहे. 25 मार्चपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे पुणे पोलिसांना उच्च न्यायालयानं निर्देश दिले आहेत.