पुण्याच्या मेट्रोमधून असा करता येणार प्रवास, जाणून घ्या तिकिटाचे दर

258 0

पुणे – येत्या रविवारी ६ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन होणार आहे. पुणेकरांसाठी मेट्रोमधून प्रवास करण्याचे पुणेकरांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. उदघाटनानंतर त्याच दिवशी पुणेकरांना मेट्रोमधून प्रवास करण्याचा आनंद घेता येणार आहे.

एकाच वेळी पुणे आणि पिंपरीतील दोन्ही मार्गिकांवर मेट्रोची सेवा नागरिकांसाठी खुली केली जाणार आहे. दिवसभरात 13 तास मेट्रो पुणे आणि पिंपरीत धावणार असून, सध्या दर अर्ध्या तासाने त्यातून प्रवास करणे शक्य होणार आहे. याबाबतचे वेळापत्रक महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड कडून लवकरच प्रसिद्ध केलं जाणार आहे.

मेट्रोचे वेळापत्रक- 

उद्घाटनानंतर दुपारी तीन ते रात्री नऊ या वेळेत मेट्रो सामान्य प्रवाशांसाठी धावणार. सात मार्चपासून सकाळी आठ ते रात्री नऊ या वेळेत दर अर्ध्या तासाने धावणार आहे.

असे असतील तिकिटाचे दर

पहिल्या तीन स्थानकांपर्यंत 10 रुपये

त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या स्थानकासाठी 20 रुपये

वनाझ ते आयडियल कॉलनी या प्रवासासाठी 10 रुपये द्यावे लागणार.

वनाझ ते एसएनडीटी किंवा गरवारे महाविद्यालयापर्यंतच्या प्रवासासाठी 20 रुपये

पिंपरीतील मार्गिकेचे तिकीट दर-

पिंपरी ते भोसरी (नाशिक फाटा) प्रवासासाठी 10 रुपये

पिंपरी ते फुगेवाडी प्रवासासाठी 20 रुपये

मेट्रोच्या एका डब्यात 325 प्रवासी क्षमता असणार असून सध्या मेट्रो तीन डब्यांची असणार आहे. त्यामध्ये एक डबा महिलांसाठी राखीव असणार आहे. मेट्रोच्या एका फेरीसाठी 975 प्रवासी करू शकणार.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!