पुणे – पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक आज महापालिकेत पार पडली. १० विरूद्ध ६ असा रासने यांनी राष्ट्रवादीचे उमदेवार प्रदीप गायकवाड यांच्यावर विजय मिळवला. रासने यांची सलग चौथ्या वेळी अध्यक्षपदावर निवड झाली आहे.
स्थायी समिती अध्यक्षपदाची मुदत २८ मार्च रोजी संपली आहे. तर महापालिकेची मुदत १४ मार्च रोजी संपणार आहे. त्यासाठी १ मार्च ते १४ मार्च या १४ दिवसांसाठी नवे स्थायी समिती अध्यक्ष निवडले गेले आहेत.
१ मार्च रोजी उमेदवारी अर्ज भरण्यात आला, त्यानंतर आज सकाळी महापालिकेत निवडणूक झाली. पीएमपीचे व्यवस्थापक संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपस्थित होते.
स्थायी समितीमध्ये भाजपचे १०, राष्ट्रवादीचे चार, शिवसेना व काँग्रेसचे प्रत्येकी एक असे एकूण १६ सदस्य आहेत. त्यामुळे रासने यांची निवड ही औपचारिकता होती.
पक्षनेत्यानी मला सलग चौथ्यांदा स्थायी समितीच्या अध्यक्षपदी होण्याची संधी दिली. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जसा न्याय मिळतो त्याचे उदाहरण आहे. रासने यांनी यावेळी खासदार प्रकाश जावडेकर, गिरीश बापट यांचे हार्दिक आभार मानले.