दोन वर्षानंतर प्रथमच बारावी बोर्डची ऑफलाईन परीक्षा

184 0

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या बोर्ड परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. राज्यातील 9,635 परीक्षा केंद्रावर 14 लाख पेक्षा अधिक विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत.कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीनं घेतली जात आहे. या परीक्षेसाठी राज्यातून एकूण 14,85,826 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या राज्यात मुख्य आणि उपकेंद्र मिळून एकूण 9635 परीक्षा केंद्र असतील. आज पहिला सामना विद्यार्थ्यांचा इंग्रजी विषयाशी असणार आहे. यावर्षी खास पेपर लिहताना ऑनलाईन शिक्षणामुळे लिखाणाचा सराव नसल्यानं यावर्षी 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिट तर 40 ते 60 गुणांसाठी 15 मिनिटांची वेळ वाढवून देण्यात आली आहे. आजपासून सुरू होणारी बारावी बोर्ड परीक्षा 7 एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे.

परीक्षा काळातील संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा, या दृष्टीनं मंडळामार्फत संपूर्ण राज्यात भरारी पथके नेमण्यात आली आहेत.विशेष महिला भरारी पथक आणि काही विभागीय मंडळात विशेष मुख्य अधिकारी यांना परीक्षा केंद्रांना भेटी देण्याबाबत मंडळाकडून विनंती करण्यात आली आहे.कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाचा पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांना निर्माण झालेल्या अडचणी लक्षात घेता ऑफलाइन पद्धतीनं आयोजित परीक्षांसाठी काही महत्त्वाच्या उपाय योजना करण्यात आलेले आहेत.

* नेहमीपेक्षा सुमारे पंधरा दिवस उशिराने परीक्षांचं आयोजन
* शाळा कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर परीक्षा केंद्र उपकेंद्र देण्यात आली आहेत
* 75 टक्के अभ्यासक्रमावर आधारित लेखी परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे
* तोंडी परीक्षा अंतर्गत मूल्यमापन याबाबत

आजपासून सुरू होणारी बारावी बोर्ड परीक्षा 7 एप्रिलपर्यंत सुरू राहील

Share This News

Related Post

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सुपरस्टार विल स्मिथने ख्रिस रॉकच्या कानाखाली लगावली (व्हिडिओ)

Posted by - March 28, 2022 0
लॉस एंजेलिस – सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणाऱ्या यंदाच्या १४ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला एका घटनेने गालबोट लागले आहे.…

धक्कादायक : वाघोलीमध्ये टॅंकमध्ये पडुन 3 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - October 21, 2022 0
पुणे : वाघोलीमध्ये आज पहाटेच्या सुमारास एस.टी.पी टॅंकचे काम चालू असतांना ३ कामगारांचा टॅंक मध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना…

‘अगं चंपाबाई, धंगेकरला जीव थोडा लाव…रवींद्र धंगेकरांच्या गाण्याचा धुमाकूळ, पाहा व्हिडिओ

Posted by - April 13, 2023 0
काही दिवसांपूर्वी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारे एक रॅपसॉंग खूपच व्हायरल झाले होते. ’50 खोके घेऊन चोर आले, गुवाहाटी’ अशा…
Parbhani News

Parbhani News : देवदर्शनाहून परतताना भीषण अपघात; 3 भाविकांचा मृत्यू

Posted by - December 17, 2023 0
परभणी : राज्यात अपघाताचे प्रमाण काही थांबायचे नाव घेईना. अशीच एक अपघाताची घटना परभणी (Parbhani News) जिल्ह्यातून समोर आली आहे.…
Pune Metro

Pune Metro : आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोच्या तिसऱ्या मार्गाचे उदघाटन

Posted by - March 6, 2024 0
पुणे : पुणे मेट्रोच्या (Pune Metro) रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *