स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय नकोत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

74 0

महाविकास आघाडी सरकारच्या ढिलाईमुळे व बेफिकीरमुळेच ओबीसी राजकीय आरक्षण गमावले असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या गुरुवारच्या आदेशामुळे स्पष्ट झाले आहे. ओबीसींच्या आरक्षणाशिवाय राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, अशी भारतीय जनता पार्टीची स्पष्ट भूमिका आहे, असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील यांनी केले.

ते म्हणाले की, शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत सुरुवातीपासून बेपर्वाई व ढिलाई केली. मार्च २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्द करणारा निकाल दिल्यानंतरही हे सरकार जागे झाले नाही. त्यानंतर जरी तातडीने सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार कारवाई केली असती व एंपिरिकल डेटा गोळा केला असता तर ओबीसींना आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण परत मिळाले असते. महाविकास आघाडी सरकार सदैव टाळाटाळ करत राहिले. आताही सर्वोच्च न्यायालयात दाद मागताना सादर केलेला अहवाल कच्चा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्यांनी सांगितले की, ओबीसींना राजकीय आरक्षण मिळूच नये या पद्धतीने महाविकास आघाडी सरकार ढिलाई आणि वेळकाढूपणा करत राहिले आहे. भाजपा हे मान्य करणार नाही. आघाडी सरकारने तातडीने सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार कारवाई करून ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवून दिले पाहिजे. हे आरक्षण पुन्हा मिळेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत.

Share This News

Related Post

पुण्यात ‘या’ तारखेला होणार महाविकास आघाडीची विराट सभा

Posted by - March 12, 2023 0
शिवसेनेचं मुळ पक्षचिन्ह आणि नाव एकनाथ शिंदे गटाला मिळाल्यापासून ठाकरे गट आक्रमक झाला आहे. आता तर थेट उद्धव ठाकरे मैदानात…
Chandrapur Accident Crime

Chandrapur Accident Crime : चंद्रपूर झालं सुन्न ! घरापासून हाकेच्या अंतरावर असताना कुटुंबाचा दुर्दैवी अंत

Posted by - August 14, 2023 0
चंद्रपूर : चंद्रपूरमधून (Chandrapur Accident Crime) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये (Chandrapur Accident Crime) ट्रकनं धडक…

महाविकास आघाडीचा महामोर्चा; मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अडीच हजार पोलीस तैनात

Posted by - December 17, 2022 0
मुंबई: महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि समविचारी संघटनांकडून मुंबई महामोर्चाच आयोजन करण्यात आलं असून उद्धव ठाकरे अजित पवार आणि नाना…
Kolhapur Suicide News

Kolhapur Suicide News : नवविवाहित दांपत्याची चुलत भावाला लोकेशन पाठवून शेतामध्ये आत्महत्या

Posted by - July 28, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये (Kolhapur Suicide News) एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आंतरजातीय प्रेम विवाह केलेल्या दांपत्याने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *