MPSC पदभरतीत मराठा आरक्षण लागू; ‘एवढ्या’ जागांची वाढ करून सुधारित जाहिरात प्रसिद्ध

257 0

नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (MPSC) कडून महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चे शुद्धिपत्रक जाहीर करण्यात आले असून त्यामध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी (SEBC) आरक्षण लागू करण्यात आले आहे. 29 डिसेंबर 2023 च्या जाहिरातीमध्ये 250 जागांची वाढ करत सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मराठा उमेदवारांना आता मागासवर्गीयांकरिता लागू असलेल्या वयोमर्यादेतील सवलतींचा लाभ घेऊन वयोमर्यादा ओलांडली असतानाही नव्याने अर्ज करणे शक्य होणार आहे.

लोकसभा निवडणूक आणि मराठा समाजाच्या आंदोलनाची दखल घेऊन राज्य शासनाकडून फेब्रुवारी 2024 मध्ये मराठा आरक्षणाचा कायदा केला होता . परंतु, आरक्षण लागू होण्याआधी ‘MPSC’च्या अनेक जाहिराती प्रसिद्ध करत विविध विभागांच्या परीक्षा प्रलंबित केल्या आहेत. आता या सर्व जाहिरातींमध्ये ‘एसईबीसी’ आरक्षण लागू करून शुद्धिपत्रक काढण्यात येणार असल्यामुळे एमपीएससीने 28 एप्रिलची ‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024’, तसेच 19 मे रोजी होणाऱ्या ‘समाज कल्याण अधिकारी गट ब’, ‘इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब’ या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. बुधवारी आयोगाकडून नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचेही शुद्धिपत्रक जाहीर केले ज्यामध्ये 250 जागांची वाढ करण्यात आली आहे.यात ‘SEBC’ म्हणजेच मराठा आरक्षण लागू करण्यात आले असून त्याशिवाय या आरक्षणाच्या लाभार्थींसाठी अनेक सुविधाही जाहीर करण्यात आल्या आहेत.

नव्याने अर्ज करण्याची संधी
जाहिरातीस अनुसरून अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतून अर्ज केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे.

त्याकरीता ‘एमपीएससी’च्या अधिकृत संकेतस्थळावर लिंक देण्यात आली असून त्यावर नव्याने अर्ज करायचा आहे. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा दावा केल्यास संबंधित उमेदवाराचा मूळ अर्जातील दावा रद्द समजण्यात येणार आहे.

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षण लागू झाल्याने आता उमेदवारांना मागासवर्गीयांकरिता लागू असलेल्या वयोमर्यादेतील सवलतींचा लाभ घेता येणार असल्यामुळे वयोमर्यादेची अट ओलांडलेल्या उमेदवारांना नव्याने अर्ज करता येणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Bajrang Punia : बजरंग पुनियाचे निलंबन; उत्तेजक सेवन चाचणीस नकार दिल्याने केली कारवाई

Narendra Dabholkar : कोण होते नरेंद्र दाभोलकर?

Narendra Dabholkar : नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी मोठी अपडेट ! 2 जणांना जन्मठेप 3 जणांची निर्दोष मुक्तता

Pune News : अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण

Mumbai-Pune Express : मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

Share This News

Related Post

एमआयटीच्या मिटसॉगच्या २० व्या तुकडीचा शुभारंभ १३ सप्टेंबर रोजी होणार

Posted by - September 10, 2024 0
  मिटसॉगच्या २० व्या तुकडीचा शुभारंभ १३ सप्टेंबर रोजी पंजाब विधानसभेचे सभापती कुलतार सिंह संधवान, डॉ. सी.पी.जोशी आणि डॉ. निलम…

पहा जमतय का ? UPSC परीक्षेमध्ये विचारला प्रश्न; कोणता प्राणी एकदा झोपल्यावर परत उठत नाही ?

Posted by - November 16, 2022 0
यूपीएससीची परीक्षा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात. खरंतर सगळेच टप्पे महत्त्वाचे आणि खडतर असतात. पण सर्वात अवघड असतो…
SSC Result Date

SSC Result Date : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी जाहीर होणार 10 वीचा निकाल

Posted by - May 22, 2024 0
पुणे : बरावीचा निकाल 21 मे रोजी जाहीर झाला आहे. त्यापाठोपाठ आता लाखो विद्यार्थ्यांना आणि पालकांना दहावीच्या निकालाची (SSC Result…
Eknath Shinde

व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा! राज्य सरकारनं घेतला हा मोठा निर्णय

Posted by - July 22, 2024 0
मुंबई: अभियांत्रिकी वैद्यकीय व विविध इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारने दिलासा दिला असून. 2024 -25 मध्ये अभियांत्रिकी,…

QR Code : क्यूआर कोड स्कॅन करताय तर सावधान ! तुमचा मोबाईलही होऊ शकतो हॅक

Posted by - June 9, 2023 0
देशात ऑनलाईन सुविधा सुरु झाल्यापासुन सगळेजण क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करताना दिसत आहेत. यामुळे देशात क्यूआर कोडद्वारे पेमेंट करण्याचं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *